ETV Bharat / bharat

Har Ghar Tiranga : भारताचे 'ध्वज काका' दररोज 1 लाख ध्वज करतात तयार

author img

By

Published : Aug 7, 2022, 4:03 PM IST

केंद्र सरकारने भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत जवळपास 20 कोटी कुटुंबांच्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल,अशी अपेक्षा आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाची मागणी (demand for national flag has increased) वाढली आहे. तर नवी दिल्ली येथील अब्दुल गफ्फार नावाच्या 71 वर्षीय व्यक्तीने एका दिवसात 1.5 लाख तिरंगे बनवण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. त्यांना सगळे 'ध्वज काका' (Abdul Ghaffar India flag uncle) या नावाने ओळखतात.

Har Ghar Tiranga
हर घर तिरंगा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत जवळपास 20 कोटी कुटुंबांच्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाची मागणी वाढली (demand for national flag has increased) आहे.

या उपक्रमामुळे, तिरंग्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे आणि ती विक्रमी संख्येपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी, नवी दिल्ली येथील अब्दुल गफ्फार हे कठोर मेहनत करीत आहेत. ते गेल्या 60 वर्षांपासुन झेंडे शिवण्याचे व विकण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची ओळख 'ध्वज काका' (Abdul Ghaffar India flag uncle) अशी निर्माण झाली आहे. 'हर घर तिरंगा' हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत. त्यांचे वय 71 वर्ष आहे. तरी देखील, सदर बाजारच्या पान मंडी मार्केटमधील "भारत हँडलूम" नावाच्या दुकानात ते आपल्या माणसांसोबत रात्रंदिवस काम करतात. एका दिवसात 1.5 लाख तिरंगे बनवण्याचा विक्रम त्यांनी व त्यांच्या कारागिरांनी मोडला आहे.

आश्चर्य म्हणजे, आतापर्यंत अब्दुल गफार यांनी अडीच महिन्यांत देशभरात 65 लाखांहून अधिक ध्वजांचा पुरवठा केला आहे. परंतु 13 ऑगस्टपर्यंत कोणत्याही किंमतीत आणखी 35 लाख ध्वजांचा पुरवठा मार्केटमध्ये करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. मार्केटमध्ये ग्राहकांना एक कोटीच्या वर तिरंगा तयार करुन देऊन, ते स्वत:चा एक विक्रम मोडणार आहे.

"एका दिवसात बनवल्या जाणाऱ्या ध्वजांची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचेल. जे कदाचित आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडेल; असा मला विश्वास आहे. आम्ही ध्वज बनवणारे पहिले आणि सर्वात जुने दुकानदार आहोत. आणि गेल्या 60 वर्षांपासुन ध्वजनिर्मिती हे एकच आमचे ध्येय होते. व्यवसाय आणि नफा हा दृष्टीकोन बाजूला ठेवला, तर 'हर घर तिरंगा' हा उपक्रम नक्कीच आपल्या सर्वांसाठी सुवर्णकाळ ठरत आहे. कारण आपण जास्तीत जास्त रोजगार देऊ शकतो आणि मजूरांना देखील चांगला पगार मिळतोय,” असे भारत हँडलूमचे मालक अब्दुल गफ्फार म्हणाले.

"आम्हाला महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंदीगड, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश अशा सर्व राज्यांमधून ऑर्डर मिळत आहेत. मागणी पूर्ण करण्यासाठी, कामगार शिफ्टमध्ये काम करत आहेत आणि त्यांचे उत्पन्नही दुप्पट झाले आहे", असे मत अब्दुल गफ्फार यांच्या दुकानातील एका कारागीराने व्यक्त केले.

हेही वाचा : Har Ghar Tiranga : हजारो युवकांचा हातात तिरंगा घेऊन रॅलीत सहभाग; 'हर घर तिरंगा' अभियान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.