महाराष्ट्र

maharashtra

लखीमपूर हिंसाचार घटनेचे रिक्रिएशन, पोलिसांनी मंत्रीपुत्रासह तिघांना नेले घटनास्थळी

By

Published : Oct 14, 2021, 5:27 PM IST

Updated : Oct 14, 2021, 5:41 PM IST

तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी जिल्हा कारागृह आवारातून दास, लतीफ आणि भारती यांना पोलीस कोठडीत आणले होते. त्यानंतर सुरक्षेच्या कडेकोट बंदोबस्तात पोलिसांनी तीन आरोपींना टिकोनिया-बनबिरपूर मार्गावरून घटनास्थळी आणण्यात आले. हे ठिकाण लखीमपूर जिल्ह्यापासून 60 किलोमीटर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लखीमपूर हिंसाचार घटना
लखीमपूर हिंसाचार घटना

लखनौ - लखीमपूर हिंसाचार घटनेची विशेष पथकाकडून (SIT) चौकशी करण्याच येत आहे. एसआयटीने केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांचा पुत्र आशिष आणि तिघांना घटनास्थळी नेले. त्या ठिकाणी गुन्ह्याचे पुन्हा दृश्य (रिक्रिएशन क्राईम सीन) तयार करण्यात आले. लखीमपूर हिंसाचाराची घटना ही उत्तर प्रदेशमधील टिकोनिया गावात घडली होती.

आशिष मिश्राबरोबर शेखर भारती, अंकित दास व लतीफला पोलिसांनी 12 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. दास, लतीफ आणि भारती यांना 14 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी जिल्हा कारागृह आवारातून दास, लतीफ आणि भारती यांना पोलीस कोठडीत आणले होते. त्यानंतर सुरक्षेच्या कडेकोट बंदोबस्तात पोलिसांनी तीन आरोपींना टिकोनिया-बनबिरपूर मार्गावरून घटनास्थळी आणण्यात आले. हे ठिकाण लखीमपूर जिल्ह्यापासून 60 किलोमीटर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या ठिकाणी क्राईम सीनचे रिक्रिएशन करण्यात आले.

लखीमपूर हिंसाचार घटनेचे रिक्रिएशन

हेही वाचा-पेट्रोलसह डिझेलच्या दरवाढीचा पुन्हा भडका; जाणून घ्या, आजचे दर

लखीमपूर हिंसाचार घटनेत 8 जणांचा मृत्यू-

3 ऑक्टोबरला लखीमपूर जिल्ह्यातील हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये 4 शेतकरी हे भाजप कार्यकर्त्यांच्या चारचाकी खाली चिरडल्याने मृत्यू पावले होते. सामूहिक हत्याकांडाने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना चारचाकीमधील लोकांना मारहाण केली. त्यामध्ये भाजपचे दोन कार्यकर्ते व वाहन चालकाचा मृत्यू झाला. तसेच एका पत्रकाराचाही मृत्यू झाला.

हेही वाचा-अभिनेत्री नोरा फतेही 'ईडी' कार्यालयात दाखल, जॅकलीन फर्नांडिस उद्या लावणार हजेरी

तिघांना पोलिसांकडून अटक

चारचाकीमध्ये अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रादेखील होता, अशा शेतकऱ्यांनी दावा केला. हा दावा अजय मिश्रासह त्यांच्या मुलाने नाकारला आहे. आशिष मिश्रा उर्फ मोनूला 9 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्या दिवशी पोलिसांनी 12 तास चौकशी केली होती. मात्र, सहकार्य न करणे व काही प्रश्नांची उत्तरे दिली नसल्याने त्याला अटक करण्यात आली होती.

हेही वाचा-भर मंदिरात मुख्यपुजाऱ्याची गोळी मारून हत्या; मारहाणीत आरोपीचा मृत्यू

Last Updated :Oct 14, 2021, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details