ETV Bharat / bharat

पेट्रोलसह डिझेलच्या दरवाढीचा पुन्हा भडका; जाणून घ्या, आजचे दर

author img

By

Published : Oct 14, 2021, 4:33 PM IST

दोन आठवड्यांत पेट्रोलचे दर 13 वेळा वाढण्यात आले आहे. तर डिझेलचे दर तीन आठवड्यांमध्ये 16 वेळा वाढल्या आहेत. 12 ऑक्टोबर आणि 13 ऑक्टोबरला पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले होते.

पेट्रोल डिझेल दर न्यूज
पेट्रोल डिझेल दर न्यूज

नवी दिल्ली - दोन दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा गुरुवारी वाढले आहेत. इंधनाचे दर प्रति लिटर 35 पैशांनी वाढले आहेत. हे दर आजपर्यंतचे सर्वाधिक आहेत.

दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 104.78 रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.75 रुपये आहे. ही माहिती सार्वजनिक तेल कंपन्यांनी दिली आहे. मुंबईमध्ये डिझेलचा दर प्रति लिटर 101.40 रुपये आहे. तर दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर 93.52 रुपये आहे.

हेही वाचा-ऑक्टोबर महिन्यात बँका सलग आठ दिवस राहणार बंद

दोन आठवड्यांत पेट्रोलचे दर 13 वेळा वाढण्यात आले आहे. तर डिझेलचे दर तीन आठवड्यांमध्ये 16 वेळा वाढल्या आहेत. 12 ऑक्टोबर आणि 13 ऑक्टोबरला पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले होते.

हेही वाचा-राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर इंडियाला केंद्राचा हिरवा कंदील; २०२२ मध्ये सुरू करणार वाहतूक

बहुतांश राज्यांत पेट्रोलसह डिझेलचे दर प्रति लिटर 100 रुपयांहून अधिक-

देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपयांहून अधिक आहेत. तर डिझेलचे दर काही राज्यांमध्ये प्रति लिटर 100 रुपयांहून अधिक आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलांगाणा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, केरळ, कर्नाटक आणि लेहचा समावेश आहे. स्थानिक कराप्रमाणे इंधनावरील कराचे प्रमाण वेगवेगळे असते.

हेही वाचा-धक्कादायक : पिझ्झासाठी 18 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या

6 ऑक्टोबरपासून इंधनाचे दर वाढण्यास सुरुवात

सार्वजनिक तेल कंपन्यांनी 6 ऑक्टोबरपासून इंधनाचे दर वाढविण्यास सुरुवात केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढून प्रति बॅरल 84 डॉलर आहेत. हे गेल्या सात वर्षांत सर्वाधिक दर आहेत. 13 सप्टेंबरला कच्च्या तेलाचे दर वाढून 73.51 डॉलर होते. भारताला पेट्रोल व डिझेलच्या गरजेसाठी बहुतांश आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर वाढल्यास त्याचा थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम होतो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.