ETV Bharat / bharat

अभिनेत्री नोरा फतेही 'ईडी' कार्यालयात दाखल, जॅकलीन फर्नांडिस उद्या लावणार हजेरी

author img

By

Published : Oct 14, 2021, 1:06 PM IST

Updated : Oct 14, 2021, 2:13 PM IST

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रसिद्ध नृत्यांगणा आणि बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला ईडीने नोटीस बजावली होती. दोनशे कोटींच्या वसुली प्रकरणी ईडी नोराची चौकशी करणार आहे. त्यासाठी नोरा फतेही दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचली आहे. तर जॅकलीन फर्नांडिसला उद्या (दि. 15) चौकशीसाठी हजेरी लावण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रसिद्ध नृत्यांगणा आणि बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला ईडीने नोटीस बजावली होती. दोनशे कोटींच्या वसुली प्रकरणी ईडी नोराची चौकशी करणार आहे. त्यासाठी नोरा फतेही दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचली आहे. ईडी मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्रीची चौकशी करेल. यापूर्वी याच प्रकरणात ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची दिल्लीत पाच तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती. जॅकलीनला याच प्रकरणात उद्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्याबाबत ईडीने नोटीस बजावली आहे.

देशाची राजधानी दिल्लीच्या तिहार कारागृहातून 200 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री लीना पाल तुरुंगात आहेत. असे सांगितले जात आहे की, सुकेशने नोरा फतेहीलाही आपल्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता.

जॅकलीन उद्या होणार हजर

याच प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला उद्या (दि. 15) चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी जॅकलीनची तब्बल पाच तास ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

काय आहे सुकेश चंद्रशेखर प्रकरण..?

सुकेश चंद्रशेखर हा तिहार कारागृहात असून सुकेशवर दोनशे कोटी रुपयांच्या वसुली व खंडणीचे रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. सुकेशने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून 50 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कारागृहात छापा टाकून सुकेश चंद्रशेखरकडून मोबाईल जप्त केले होते.

हेही वाचा - बिग बॉस मराठी सिझन तिसरामध्ये रहिवाश्यांचे रुसवे फुगवे!

Last Updated : Oct 14, 2021, 2:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.