ETV Bharat / bharat

भर मंदिरात मुख्यपुजाऱ्याची गोळी मारून हत्या; मारहाणीत आरोपीचा मृत्यू

author img

By

Published : Oct 14, 2021, 2:46 PM IST

Updated : Oct 14, 2021, 3:27 PM IST

बिहारमधील रामबागका या परिसरातील कंकाली मंदिरात मुख्यपुजारी राजीव झा यांची गोळी मारून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तीन आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. पुजाऱ्यांना गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, भक्तांनी आरोपींना चांगलाच चोप दिला आहे.

Kankali temple priest shot dead in Darbhanga
मुख्यपुजाऱ्याची गोळी मारून हत्या

दरभंगा - बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात विवि ठाण्याच्या परिसरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रामबागका या परिसरातील कंकाली मंदिरात मुख्यपुजारी राजीव झा यांची गोळी मारून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तीन आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. पुजाऱ्यांना गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, भक्तांनी आरोपींना चांगलाच चोप दिला आहे. या मारहाणी एका आरोपीचाही मृत्यू झाला आहे.

भर मंदिरात मुख्यपुजाऱ्याची गोळी मारून हत्या; मारहाणीत आरोपीचा मृत्यू

पोलिसांनी दोन आरोपींना गंभीर जखमी अवस्थेत ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर डीएमसीएच रूग्णालयात उपचार चालू आहेत. अद्याप पुजाऱ्यांची हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली आहे यांची माहिती मिळालेली नाही आहे. पुजाऱ्यांच्या हत्येमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Kankali temple priest shot dead in Darbhanga
घटनास्थळाला पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी

उच्च अधिकाऱ्यांनी घेतला आढावा -

या घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ कृष्णनंदन यांनी घटनास्थळाला भेट दिली व सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पोलिसांनी मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी डीएमसीएच रूग्णालयात पाठवले आहे.

'ते खाली कोसळलेले होते'

मृतकाचे शेजारी अभिषेक झा यांनी सांगितले की, त्यांना मंदिरात गोळी चालल्याचा माहिती मिळताच ते धावत मंदिरात गेले. यावेळी त्यांनी पाहिले की, पुजारी हे खाली कोसळलेले होते. त्यांनी त्यांनी तत्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांनी सांगितले की, डॉक्टर म्हणाले की त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. त्यानंतर त्यांनी त्यांचा मृतदेह पुन्हा मंदिर परिसरात आणला.

दोन आरोपींना घेतले ताब्यात -

एसडीपीओ कृष्णनंदन यांनी सांगितले की, कंकाली मंदिरच्या पुजाऱ्यांची गोळी मारून हत्या केल्याची माहिती मिळताच आम्ही तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. लोकांनी एका आरोपी खूप मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. अन्य दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ते गंभीर जखमी असल्याने त्यांना डीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून एक पिस्टल आणि 2-3 फायर केलेल्या गोळ्या सापडल्या आहेत. एसडीपीओने सांगितले की हत्येच्या कारणाची माहिती घेतली जात आहे.

हेही वाचा - भाई का बड्डे! पठ्ठ्याने एकाच वेळी 550 केक कापले

Last Updated :Oct 14, 2021, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.