महाराष्ट्र

maharashtra

गुजरातमधील मुंद्रा बंदरातून 9,000 कोटींचे हेरॉइन जप्त, गुप्तचर विभागाची सर्वात मोठी कारवाई

By

Published : Sep 20, 2021, 1:23 PM IST

मुंद्रा बंदरातून 9,000 कोटी रुपयांचे हेरोइन जप्त
मुंद्रा बंदरातून 9,000 कोटी रुपयांचे हेरोइन जप्त

गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा बंदरावर हेरॉईन पकडण्यात आले आहे, ज्याची किंमत सुमारे 9 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. हे हेरॉईन अफगाणिस्तानातून आयात केले जात होते. दरम्यान, त्याला गुप्तचर यंत्रणेने बंदरावर पकडले आहे. हे हेरॉईन टेलकम पावडरच्या स्वरूपात भारतात आणले जात होते. परंतु, एजन्सीने वेळीच लक्ष दिल्याने बंदरावर ही आयात रोखण्यात आली. दरम्यान, एजन्सीची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

मुंबई - गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा बंदरावर हेरॉईन पकडण्यात आले आहे, ज्याची किंमत सुमारे 9 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ही हेरॉईन अफगाणिस्तानातून आयात केले जात होते. दरम्यान, त्याला गुप्तचर यंत्रणेने बंदरावर पकडले आहे. हे हेरॉईन टेलकम पावडरच्या स्वरूपात भारतात आणले जात होते. परंतु, एजन्सीने वेळीच लक्ष दिल्याने बंदरावर ही आयात रोखण्यात आली. दरम्यान, एजन्सीची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यातील कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून आफगाणिस्तानातून मुंद्रा बंदरावर आयात करण्यात आले होते.

मुंद्रा बंदरातून 9,000 कोटी रुपयांचे हेरोइन जप्त

'स्थित हसन हुसेन लिमिटेड'

फर्मकडे यातील मालाबद्दल चौकशी केली असता, ही टेलकम पावड असल्याचे सांगितले होते. दरम्यान, गुप्तचर विभागाला शंका आल्याने त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये हेरॉईन असल्याचे समोर आले. ही निर्यात करणारी फर्म अफगाणिस्तानच्या कंधार येथे 'स्थित हसन हुसेन लिमिटेड' म्हणून ओळखली जाते.

मुंद्रा बंदरातून 9,000 कोटी रुपयांचे हेरोइन जप्त

टेलकम पावडरच्या स्वरुपात करोडो किमतीची औषधे आयात केली जातात

डीआरआय आणि कस्टमचे ऑपरेशन गेल्या पाच दिवसांपासून सुरू होते. ही कारवाई झाल्यानंतर अधिकार्‍यांनी पुढील तपासणीसाठी माल पाठवल्याची माहिती आहे. तसेच, मुंद्रा बंदराव्यतिरिक्त गांधीधाम, मांडवी, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नईसह 5 इतर शहरांचा तपास करण्यात आला. या तपासात टेलकम पावडरच्या स्वरुपात करोडो किमतीची औषधे आयात केली जात असल्याची माहिती शोध यंत्रणेच्या लक्षात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details