महाराष्ट्र

maharashtra

Earthquake In Sikkim : सिक्कीममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 4.3 एवढी तीव्रता

By

Published : Feb 13, 2023, 9:04 AM IST

तुर्की आणि सीरियात गेल्या आठवड्यात आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता आज पहाटे सिक्कीम मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या धक्यांची तीव्रता 4.3 एवढी मोजली आहे.

Earthquake
भूकंप

गंगटोक (सिक्कीम): सिक्कीम मध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.3 मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सिक्कीमच्या उत्तरेला 70 किमी अंतरावर असलेल्या युकसोम येथे पहाटे 4.15 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 27.81 आणि रेखांश 87.71 होता. भूकंपाची खोली 10 किमी इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपात सध्या तरी कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.

तुर्की भूकंपातील मृतांची संख्या :गेल्या आठवड्यात तुर्की आणि उत्तर-पश्चिम सीरियामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 34,000 वर पोहोचली आहे. बचावाचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. रविवारी मृतांचा आकडा किमान 34,179 वर पोहोचला. सीरियातील मृतांची संख्या 4,574 असल्याची पुष्टी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उत्तर-पश्चिम सीरियाच्या विरोधी-नियंत्रित भागांमध्ये मृतांची संख्या 3,160 पेक्षा जास्त आहे. सरकारी वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, सीरियाच्या सरकार-नियंत्रित भागांमध्ये एकूण 1,414 मृत्यू झाले आहेत.

भारतात मोठ्या भूकंपाची शक्यता : आयआयटी कानपूरचे प्राध्यापक जावेद मलिक यांनी दावा केला आहे की, भारतातही तुर्कीप्रमाणेच मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीपासून लखनऊपर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. येत्या काही दिवसांत भारतात भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांनी याबाबत संशोधन केले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिमालय किंवा अंदमान निकोबार किंवा कच्छ असू शकतो असा त्यांचा दावा आहे.

कोणते शहर कोणत्या झोनमध्ये : झोन 2 मध्ये भोपाळ, जयपूर, हैदराबाद आणि इतर जवळपासची शहरे समाविष्ट आहेत. झोन 3 मध्ये कानपूर, लखनौ, प्रयागराज, वाराणसी, गोरखपूर, सोनभद्र, चंदौली आणि इतर जवळपासची शहरे समाविष्ट आहेत. झोन-4 मध्ये बहराइच, लखीमपूर, पिलीभीत, गाझियाबाद, रुरकी, नैनिताल, लखीमपूर आणि इतर तराई क्षेत्रांचा समावेश आहे. याशिवाय झोन-5 मध्ये कच्छ, अंदमान आणि निकोबार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि इतर जवळपासची राज्ये आणि शहरे आहेत.

का होतात भूकंप : जमिनीत खूप खोलीवर टेक्टोनिक प्लेट्स असतात. त्यांची हालचाल, एकमेकांवर आदळणे आणि चढ-उतार यामुळे प्लेट्समध्ये सतत तणावाची स्थिती निर्माण होते. नंतर या ताणावाचे रूपांतर ऊर्जेत होते आणि त्यामुळे सर्वसामान्यपणे भूकंपाचे धक्के बसतात. जर ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात सोडली गेली, तर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवतात किंवा या भूकंपाच्या धक्यांची तीव्रता खूप जास्त असते.

हेही वाचा :Earthquake May Hit India: सावधान भारतात होऊ शकतो ७.५ तीव्रतेचा भूकंप.. आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकाचा दावा..

ABOUT THE AUTHOR

...view details