ETV Bharat / bharat

Earthquake May Hit India: सावधान भारतात होऊ शकतो ७.५ तीव्रतेचा भूकंप.. आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकाचा दावा..

author img

By

Published : Feb 11, 2023, 1:53 PM IST

एकीकडे नुकतेच तुर्कस्तान आणि सीरियात झालेल्या भूकंपामुळे लोक भयभीत झालेले असताना भारतातही ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी देशातील अनेक शहरांमध्ये भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

Kanpur IIT professor  Javed Malik claims, an earthquake of more than 7.5 magnitude may hit India
भारतात होऊ शकतो ७.५ तीव्रतेचा भूकंप.. आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकाचा दावा..

कानपूर (उत्तरप्रदेश): नुकतेच तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आहे. या आपत्तीत 20 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय अनेक जण जखमीही झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण जगात भूकंपाच्या अंदाजाबाबत चर्चा सुरू झाली आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक जावेद मलिक यांनी दावा केला आहे की, भारतातही अशाच प्रकारचा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत घाबरण्याऐवजी सतर्क राहण्याची गरज आहे.

का होतात भूकंप : प्रा. जावेद मलिक यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना सांगितले की, जमिनीत खूप खोलीवर टेक्टोनिक प्लेट्स आहेत. त्यांची हालचाल, एकमेकांवर आदळणे आणि चढ-उतार यामुळे प्लेट्समध्ये सतत तणावाची स्थिती निर्माण होते. नंतर त्याचे रूपांतर ऊर्जेत होते आणि त्यामुळे सर्वसामान्यपणे भूकंपाचे धक्के बसतात. जर ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात सोडली गेली, तर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवतात किंवा त्यांची तीव्रता खूप जास्त असते. त्यांनी सांगितले की, तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल होती.

हा असू शकतो केंद्रबिंदू: आयआयटीचे प्रोफेसर जावेद मलिक म्हणाले की, लवकरच भूकंपामुळे देश हादरण्याची शक्यता आहे. मात्र आपल्याला घाबरण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी दिल्लीपासून लखनऊपर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. येत्या काही दिवसांत भारतात भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांनी याबाबत संशोधन केले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिमालय किंवा अंदमान निकोबार किंवा कच्छ असू शकतो असा त्यांचा दावा आहे.

कोणते शहर कोणत्या झोनमध्ये : झोन 2 मध्ये भोपाळ, जयपूर, हैदराबाद आणि इतर जवळपासची शहरे समाविष्ट आहेत. झोन 3 मध्ये कानपूर, लखनौ, प्रयागराज, वाराणसी, गोरखपूर, सोनभद्र, चंदौली आणि इतर जवळपासची शहरे समाविष्ट आहेत. झोन-4 मध्ये बहराइच, लखीमपूर, पिलीभीत, गाझियाबाद, रुरकी, नैनिताल, लखीमपूर आणि इतर तराई क्षेत्रांचा समावेश आहे. याशिवाय झोन-5 मध्ये कच्छ, अंदमान आणि निकोबार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि इतर जवळपासची राज्ये आणि शहरे आहेत.

झोन-३ सुरक्षित : प्रा. जावेद म्हणाले की, देशातील झोन-५ मधील भागात भूकंप होण्याची सर्वाधिक शक्यता असते. तर झोन-३ चे क्षेत्र त्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे. यासोबतच झोन-2 आणि झोन-4 या भागात भूकंपाचा धोका कायम असल्याचेही ते म्हणाले. यापूर्वी 2004 साली अंदमान आणि निकोबारमध्ये 9.1 तीव्रतेचे भूकंप झाले आणि मध्य हिमालयातील कुमाऊं हिमाचल प्रदेशात 7.5 ते 8.7 तीव्रतेचे भूकंप झाले आहेत.

हेही वाचा: Koyna Seismological Station : कोयना भूकंप मापन केंद्रावर तुर्की, सीरियातील भूकंपाच्या अचूक नोंदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.