महाराष्ट्र

maharashtra

Budgam Young Girl Killed : श्रध्दा वालकर हत्याकांडाची जम्मू काश्मीरमध्ये पुनरावृत्ती, तरुणीचे शरीराचे तुकडे करून फेकले!

By

Published : Mar 12, 2023, 1:02 PM IST

Updated : Mar 12, 2023, 1:12 PM IST

जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी बडगाम जिल्ह्यात एका तरुणीच्या हत्येप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील श्रध्दा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली असल्याचे बोलले जात आहे.

Budgam Young Girl Killed
जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात तरुणीची हत्या

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी बडगाम जिल्ह्यात एका मुलीच्या हत्येप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली. तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपींनी तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि बडगाममधील (जम्मू-काश्मीर) वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. गेल्या चार दिवसांपासून तरुणी बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे.

मुलीचा शिरच्छेद करून मृतदेहाचे तुकडे : प्राप्त माहितीनुसार, शब्बीर अहमद वानी असे आरोपीचे नाव आहे. तो मोहनपोरा ओमपोरा, बडगामचा रहिवासी आहे. शब्बीर अहमद वाणी (४५) हा व्यवसायाने सुतार आहे. त्याने तरुणीचा शिरच्छेद करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. व्यवसायाने सुतार असलेल्या, 45 वर्षीय विवाहित शब्बीर अहमद वानी याने, सोइबुग येथील 30 वर्षीय अविवाहित तरुणीची हत्या केली. त्याने मोहनपोरा (ओमपोरा) येथील घरी, तिचे डोके कापले, शरीराचे तुकडे केले आणि बडगाममधील वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे जप्त केले : आरोपीने चौकशीदरम्यान खुलासा केला आहे की, त्याने तरुणीची (30) हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे रेल्वे ब्रिज ओमपोरा आणि सेबडेनवर वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी आरोपीचे डोके व शरीराचे इतर अवयव जप्त केले आहेत. या घटनेची पुष्टी करताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'आरोपीला अटक करण्यात आली आहे. मृतदेहाचे सर्व अवयव वेगवेगळ्या ठिकाणाहून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

मुलीच्या भावाने पोलिस ठाण्यात दिली होती तक्रार : मुलीचा भाऊ तनवीर अहमद खान याने सोइबग पोलिस चौकीत तक्रार दिल्याची माहिती आहे की, त्याची बहीण (वय 30 वर्षे, 07 मार्च रोजी कोचिंगसाठी निघाले, परंतु घरी परतली नाही. बेपत्ता असल्याची तक्रार मिळताच, पोलिसांनी सुत्रे हाती घेतली होती.

संशयावरुन अटक : पोलिसांनी शबीर अहमद वानी, अब्दुल अझीझ वानी यांना मोहंदपोरा बडगामसह अनेक संशयितांना ताब्यात घेतले. सतत चौकशी केल्यानंतर शाबीरने बेपत्ता मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. आपला गुन्हा लपविण्यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करून; त्याचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी पुरले होते. त्याच्या खुलाशावरून हे भाग जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील वैद्यकीय-कायदेशीर औपचारिकता सुरू आहे. तसेच प्रकरणाचा उर्वरित तपास केल्या जात आहे.

हेही वाचा : Palghar Crime : किरकोळ वादातून मुलाकडून आईची हत्या; आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

Last Updated : Mar 12, 2023, 1:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details