ETV Bharat / state

Palghar Crime : किरकोळ वादातून मुलाकडून आईची हत्या; आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

author img

By

Published : Mar 10, 2023, 11:54 AM IST

Updated : Mar 10, 2023, 5:39 PM IST

विरारमध्ये मुलाने आईची हत्या केली. भांडणाच्या रागातून हत्या केल्याचे समोर आले आहे. अद्याप आरोपीची माहिती समोर आलेली नाही. संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.

Palghar Crime
किरकोळ वादानंतर मुलाकडून आईची हत्या

किरकोळ वादातून मुलाकडून आईची हत्या

पालघर : पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 26 वर्षीय तरुणाने त्याच्या आईची हत्या केली. पोलिसांनी त्याबाबातची माहिती दिली आहे. मात्र या घटनेवर सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गुरूवारी घटना घडली. गुरुवारी घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भांडणाच्या रागातून हत्या : 44 वर्षीय पीडित महिला ही विरारच्या फुलपाडा भागातील गांधी नगर कॉलनीत आपल्या मुलासोबत राहत होत्या. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2 दिवसांपूर्वी एका लग्न समारंभात आई मुलामध्ये वाद झाला. अगदी क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी पुन्हा त्यांच्यात भांडण होऊ लागल्यावर, रागाच्या भरात आरोपी मुलाने हे कृत्य केले. विरार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतची माहिती दिली. अद्याप आरोपीची माहिती समोर आलेली नाही.

लग्न समारंभात आई मुलामध्ये वाद : घटनेनंतर काही वेळाने मृत महिलेची आई त्यांच्या घरी पोहोचली आणि तिला संपूर्ण घटना दिसली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले, असे मृत महिलेच्या आईने सांगितले. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता, त्याला नंतर अटक करण्यात आली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या : नागपूर शहरात पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हत्या केली. आरोपी तिच्या चारित्र्यावर संशय घेत वाद उकरून काढायचा. त्यातच रागाच्या भरात आरोपीने पत्नीची हत्या केली. दाम्पत्याला दोन मुली आहेत. एका ब्युटी पार्लरमध्ये पत्नी काम करत होती. त्यामुळे नराधम पती नेहमीच तिच्या चारित्र्यावर संशय घेत भांडण करत होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना तिला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. या घटनेची माहिती कळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी पतीला अटक केली, तपासाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा : Woman Murder on Women's Day : पत्नीने पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात धरून संशयखोर पतीने केली हत्या

Last Updated : Mar 10, 2023, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.