महाराष्ट्र

maharashtra

अभिनंदन, अगरवाल यांच्या दलाला मिळणार 'युनिट सायटेशन अवॉर्ड'

By

Published : Oct 6, 2019, 1:31 PM IST

बालाकोटमधील एअर स्ट्राईक पार पाडणाऱ्या आणि त्यानंतर पाकिस्तानकडून झालेल्या हवाई हल्ल्याला शूरपणे परतवून लावणाऱया अभिनंदन वर्धमान आणि मिंटी अगरवाल यांच्या पथकांना यावर्षीचा युनिट सायटेशन अवॉर्ड देण्यात येणार आहे.

Abhinandan

नवी दिल्ली- विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या ५१ स्क्वाड्रन, आणि स्क्वाड्रन लीडर मिंटी अगरवाल यांच्या ६०१ सिंगल युनिट यांना यावर्षीच्या युनिट सायटेशन अवॉर्ड देण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल आर.के.एस. भादुरिया यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील.

फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानने केलेला हवाई हल्ला परतवून लावत, पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ जहाज खाली पाडल्याची कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन यांच्या युनिटला हा पुरस्कार मिळणार आहे. तर, बालाकोटवरील एअर स्ट्राईकमधील सहभागाबद्दल मिंटी अगरवाल यांच्या युनिटला हा पुरस्कार मिळणार आहे.अभिनंदन यांच्या युनिटला मिळणारा पुरस्कार हा, कमांडिंग ऑफिसर ग्रुपचे कॅप्टन सतीश पवार हे स्वीकारतील. आठ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या हवाई दलाच्या कार्यक्रमात हे पुरस्कार वितरित केले जातील.

ABOUT THE AUTHOR

...view details