ETV Bharat / bharat

फारुख अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी १५ नेत्यांचे शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये दाखल

author img

By

Published : Oct 6, 2019, 1:13 PM IST

जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमार अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी पक्षातील १५ नेत्यांचे शिष्टमंडळ आज श्रीनगरमध्ये पोहोचले आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना दिलेल्या निवेदनानंतर राज्य सरकारने शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी मिळाली होती.

Farooq Abdullah

नवी दिल्ली - जम्मू काश्मीर प्रशासनाने रविवारी नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) नेत्यांच्या शिष्टमंडळाला पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला तसेच उपाध्यक्ष ओमार अब्दुल्ला यांना भेटण्याची परवानगी दिली. त्यानंतर थोड्याच वेळापूर्वी १५ नेत्यांचे शिष्टमंडळ अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी श्रीनगरला पोहोचले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात झालेल्या घडामोडी पाहता ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

  • #WATCH National Conference (NC) leaders Hasnain Masoodi and Akbar Lone meet former J&K CM Farooq Abdullah and his wife Molly Abdullah at their residence in Srinagar pic.twitter.com/G842irK9NJ

    — ANI (@ANI) October 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फारुख अब्दुल्ला यांना श्रीनगरमधील त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तर, ओमार अब्दुल्ला यांना राज्य अतिथिगृहात ताब्यात ठेवले आहे. पक्षाचे जम्मू प्रांत अध्यक्ष देवेंदरसिंग राणा यांच्या नेतृत्वात हे १५ जणांचे शिष्टमंडळ दोघांचीही भेट घेईल.
पक्षाच्या शिष्टमंडळाला पक्षाध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी असे निवेदन राज्यपाल सत्यपाल मलिक यांना देण्यात आले होते, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते मदन मंटू यांनी दिली. काश्मीर खोऱ्यात शांततापूर्ण मार्गाने राजकीय संवाद सुरु व्हावा अशी त्यांची इच्छा असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.जवळपास सर्व विरोधी पक्षनेत्यांना केंद्र सरकारने सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेतले आहे, किंवा नजरकैदेत ठेवले आहे. यामध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय खदखद पहायला मिळत आहे.

हेही वाचा : उत्तरप्रदेशात डबल डेकर रेल्वे रुळावरुन घसरली, मदतकार्य सुरू

Intro:Body:

A 15-member National Conference (NC) delegation arrives in Srinagar to meet party President Farooq Abdullah today 

Farooq Abdullah, Omar Abdullah, National Conference, फारुख अब्दुल्ला, ओमार अब्दुल्ला, Jammu and Kashmir today, Kashmir news today, जम्मू आणि काश्मीर, कलम ३७०

फारुख अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी १५ नेत्यांचे शिष्टमंडळ पोहोचले श्रीनगरला..

नवी दिल्ली - जम्मू काश्मीर प्रशासनाने रविवारी नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) नेत्यांच्या शिष्टमंडळाला पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला तसेच उपाध्यक्ष ओमार अब्दुल्ला यांना भेटण्याची परवानगी दिली. त्यानंतर थोड्याच वेळापूर्वी १५ नेत्यांचे शिष्टमंडळ अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी श्रीनगरला पोहोचले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात झालेल्या घडामोडी पाहता ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

फारुख अब्दुल्ला यांना श्रीनगरमधील त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तर, ओमार अब्दुल्ला यांना राज्य अतिथिगृहात ताब्यात ठेवले आहे. पक्षाचे जम्मू प्रांत अध्यक्ष देवेंदरसिंग राणा यांच्या नेतृत्वात हे १५ जणांचे शिष्टमंडळ दोघांचीही भेट घेईल.  

पक्षाच्या शिष्टमंडळाला पक्षाध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी असे निवेदन राज्यपाल सत्यपाल मलिक  यांना देण्यात आले होते, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते मदन मंटू यांनी दिली. काश्मीर खोऱ्यात शांततापूर्ण मार्गाने राजकीय संवाद सुरु व्हावा अशी त्यांची इच्छा असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

जवळपास सर्व विरोधी पक्षनेत्यांना केंद्र सरकारने सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेतले आहे, किंवा नजरकैदेत ठेवले आहे. यामध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय खदखद पहायला मिळत आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.