महाराष्ट्र

maharashtra

Amit Shah On Manipur : मणिपूर हिंसाचाराची निवृत्त न्यायाधिशांच्या समितीकडून होणार चौकशी; उद्यापासून कोम्बींग ऑपरेशन - अमित शाह

By

Published : Jun 1, 2023, 11:51 AM IST

Updated : Jun 1, 2023, 1:07 PM IST

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा निर्धार केल्याचे सांगितले. त्यामुळे लवकरच नागरिक त्यांच्या घरी परततील असे आश्वासनही अमित शाह यांनी यावेळी नागरिकांना दिले.

Amit Shah On Manipur
अमित शाह यांनी घेतली आढावा बैठक

इंफाळ : मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी सीबीआयने सहा गुन्हे दाखल केले आहेत. खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्या आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे शस्त्र आहेत, त्यांनी ते शस्त्र पोलिसांकडे जमा करावी, नाहीतर उद्यापासून कोम्बिंग ऑपरेशन रावण्यात येणार असून गुन्हेगारांची गय केली जाणार नसल्याचे अमित शाह यांनी ठणकावले आहे. यावेळी मणिपूर हिंसाचाराची निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी करण्यात येणार असल्याचेही अमित शाह यांनी स्पष्ट केले.

शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार कटीबद्ध :मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूर दौऱ्यावर गेले आहेत. अमित शाह मणिपूर येथे पत्रकार परिषद घेत आहेत. सरकार मणिपूरमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. विस्थापित नागरिकांना त्यांच्या घरी परत येण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी दिली.

इंफाळमधील मदत छावणीला भेट :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कांगपोकपी येथील एका मदत शिबिराला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील कुकी समुदायाच्या सदस्यांची भेट घेतली. मणिपूरमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्‍याचा आमचा प्रयत्न असल्याचे अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केले. नागरिकांचे घरी परतणे सुनिश्चित करण्‍याचा आमचा निर्धार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. डोंगराळ भागात आणि चुराचंदपूर, मोरे आणि कांगपोकपी येथे आपत्कालीन गरजांसाठी हेलिकॉप्टर सेवा प्रदान केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी नागरिकांना दिले.

शांतता प्रस्थापित करण्याचा सरकारचा संकल्प : इंफाळमध्ये अमित शाह यांनी मीतेई नागरिक राहत असलेल्या एका मदत शिबिराला भेट दिली. मणिपूरला पुन्हा एकदा शांतता आणि सौहार्दाच्या मार्गावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना लवकरात लवकर त्यांच्या घरी परतण्यास मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्यातील सुरक्षा परिस्थितीचा घेतला आढावा : कांगपोकपी येथे अमित शाह यांनी नागरी संघटनांसोबत बैठक घेतली. नागरी समाज संघटनांनी मणिपूरमधील समुदायांमध्ये एकोपा प्रस्थापित करण्यासाठी सरकारसोबत सक्रियपणे सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट केले. गृहमंत्र्यांनी म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मोरेहला भेट दिली. राज्यातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शाह यांनी तेथे आढावा बैठक घेतली.

हेही वाचा -

  1. Manipur Violence : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये घेतली उच्चस्तरीय बैठक
  2. Amit Shah Bihar Visit : 'देशाच्या जनतेने ठरवलंय, तिसऱ्यांदाही मोदीजीच पंतप्रधान होणार', अमित शाह
  3. PM Modi Mann ki baat : मन की बातचा आज शंभरावा भाग; मुंबईतून अमित शाह सहभागी
Last Updated : Jun 1, 2023, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details