महाराष्ट्र

maharashtra

Tiger Project: देशात वाघांची संख्या वाढली! 2967 वरून 3167 वर पोहचली

By

Published : Apr 9, 2023, 9:36 PM IST

भारतात वाघांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रोजेक्ट टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काही संख्या जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्या देशात वाघांची संख्या सध्या 3167 इतकी झाली आहे.

Tiger Project
देशात वाघांची संख्या वाढली

नवी दिल्ली :भारतात वाघांची संख्या 3167 वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवार (दि. 09 एप्रिल)रोजी टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजीत कार्यक्रमात काही आकडेवारी जाही केली आहे. त्यामध्ये त्यांनी ही आकडेवारी सांगितली आहे. प्रोजेक्ट टायगर 1 एप्रिल 1973 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुरू केला होता. त्याची सुरुवात त्यांनी जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पातून केली होती.

संख्या सुमारे 40 हजार होती : 1973 मध्ये वाघांची संख्या केवळ 268 होती. त्यावेळी केवळ नऊ व्याघ्र प्रकल्प केंद्रे होते. सध्या देशभरात 53 व्याघ्र प्रकल्प निर्माण झाले आहेत. जगातील 70% वन्य वाघ भारतात आहेत. 1973 नंतर 2008 मध्ये पहिल्यांदा वाघांची गणना करण्यात आली. त्यानंतर त्याची संख्या 1401 होती. मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 1900 च्या सुरुवातीला भारतात वाघांची संख्या सुमारे 40 हजार होती. आता तुम्ही कल्पना करू शकता की वाघांची संख्या किती वेगाने कमी झाली आहे.

त्याची संख्या 3167 वर पोहोचली : एनडीटीव्हीच्या अहवालानुसार 2008 मध्ये वाघांची संख्या 1401, 2010 मध्ये 1706, 2014 मध्ये 2226 आणि 2018 मध्ये 2967 होती. म्हणजेच वाघांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे तुम्ही निश्चितपणे म्हणू शकता. आता त्याची संख्या 3167 वर पोहोचली आहे.

भारतात त्यांची संख्या वाढत आहे : प्रकल्प टायगरच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील वाघांची संख्या वाढणे ही संपूर्ण जगासाठी अभिमानाची बाब आहे. ते म्हणाले की, भारत हा असा देश आहे, जिथे आपण परंपरेने निसर्गाला संस्कृतीचा भाग मानतो आणि सह-अस्तित्वावर विश्वास ठेवतो. पंतप्रधान म्हणाले की जगातील इतर देशांमध्येही व्याघ्र प्रकल्प आहेत. परंतु, तेथे त्यांची संख्या एकतर स्थिर आहे किंवा कमी होत आहे. परंतु, भारतात त्यांची संख्या वाढत आहे. तसेच, विकासाचे कारण आपली संस्कृती आहे. आम्ही सहअस्तित्वावर विश्वास ठेवतो. सध्या बिबट्यांच्या संख्येत 60 टक्के वाढ झाली आहे. असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा :रामनवमीला प्रक्षोभक भाषण दिल्याने झाली दंगल, काजल हिंदुस्थानीला गुजरातमध्ये अटक

ABOUT THE AUTHOR

...view details