ETV Bharat / bharat

Kajal Hindustani Arrested: रामनवमीला प्रक्षोभक भाषण दिल्याने झाली दंगल, काजल हिंदुस्थानीला गुजरातमध्ये अटक

author img

By

Published : Apr 9, 2023, 8:06 PM IST

रामनवमीच्या मुहूर्तावर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी काजल हिंदुस्तानीला अटक केली आहे. काजलने उना येथे भाषण केले होते. काजल स्वतःला राष्ट्रवादी विचारसरणीची महिला म्हणून सांगते. काजल ही भाजपला पाठिंबा देत असते. रामनवमीपासून पोलीस तिचा शोध घेत होते. तिच्याविरुद्ध वेरावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर काजलने आत्मसमर्पण केले आहे.

RIGHT WING ACTIVIST KAJAL HINDUSTANI ARRESTED IN GUJARAT FOR HATE SPEECH
रामनवमीला प्रक्षोभक भाषण दिल्याने झाली दंगल, काजल हिंदुस्थानीला गुजरातमध्ये अटक

अहमदाबाद (गुजरात): गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यात रामनवमीच्या दिवशी 1 एप्रिल रोजी उना शहरात जातीय दंगल घडवून आणल्याबद्दल प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या काजल हिंदुस्तानी हिला रविवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती दिली असून, हिंदुस्थानी हिने रविवारी सकाळी उना येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर तिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

केले होते प्रक्षोभक भाषण: विश्व हिंदू परिषदेने (विहिप) आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये हिंदुस्थानी नियमितपणे सहभागी होत आहेत. तिच्या ट्विटर अकाउंटच्या माहितीत ती स्वत:ला उद्योजक, संशोधन विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ता आणि राष्ट्रवादी भारतीय असे वर्णन करते. 30 मार्च रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर विहिंपने आयोजित केलेल्या मेळाव्यात तिने कथितपणे प्रक्षोभक भाषण केल्याच्या दोन दिवसांनंतर, 2 एप्रिल रोजी हिंदुस्थानीविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.

८० लोकांना झाली आहे अटक: पोलिसांनी सांगितले की, हिंदुस्थानींच्या भाषणानंतर दोन दिवस उनामध्ये जातीय तणाव निर्माण झाला, परिणामी 1 एप्रिलच्या रात्री दोन समुदायांमध्ये संघर्ष आणि दगडफेक झाली. पोलिसांनी दंगलीसाठी जमावाविरुद्ध एफआयआर नोंदवला आणि 80 हून अधिक लोकांना अटक केली. तिच्या भाषणामुळे उनामध्ये जातीय संघर्ष निर्माण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. उना येथे १ एप्रिल रोजी हाणामारी झाली होती. काजल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती हिंदूंच्या कार्यक्रमात सहभागी होत असते. तिच्यावर IPC च्या कलम 295A अंतर्गत म्हणजे हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

अनेक ठिकाणी झाली दंगल: दरम्यान, या वर्षी भगवान श्रीरामाच्या रामनवमीच्या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी दंगली उसळल्या होत्या. या दंगलीची आग काही ठिकाणी तीन ते चार दिवस भडकत असल्याचे दिसून आले. त्यानंतर देशभरात अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती. आता गुजरातमधल्या या दंगलीत काजल हिंदुस्थानी हिला अटक करण्यात आल्याने पोलिसांचा तपास पुढे जाणार आहे.

हेही वाचा: गुजरातमधील आदर्श गाव, दिसते शहरासारखे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.