ETV Bharat / entertainment

गर्भवती दीपिका पदुकोणला ॲटली आणि अल्लू अर्जुनच्या 'राका'मधून वगळले जाईल का? निर्मात्यांनी केला खुलासा...

'राका' टीमनं दीपिका पदुकोणच्या भूमिकेबद्दलच्या अफवांवर स्पष्टीकरण दिलंय. अशी अफवा पसरली होती की, गरोदर असल्यानं तिची 'राका'मधून भूमिका कमी करण्यात येईल.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 23, 2026 at 5:17 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी नुकतीच त्यांच्या दुसऱ्यांदा गरोदर असल्याची घोषणा केली. या आनंदाच्या बातमीनंतर, या स्टार कपलवर चाहत्यांनी प्रेमाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. या जोडप्यानं 19 एप्रिल रोजी इंस्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली, ज्यात त्यांची मुलगी दुआ प्रेग्नन्सी टेस्ट किट घेऊन उभी आहे. दीपिकाच्या आगामी 'राका' या चित्रपटाबद्दल काही अफवा सोशल मीडियावर पसरल्या जात आहेत, ज्यात तिच्या गरोदरपणामुळं चित्रपटातील तिच्या भूमिकेत बदल होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात होता. चित्रपटाच्या टीमनं आता या दाव्यांबद्दल स्पष्टीकरण दिलंय.

'राका'मधून दीपिकाला काढले जाईल ? : अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार, गरोदरपणामुळं 'राका'मधील दीपिकाची भूमिका कमी केली जाऊ शकते किंवा तिला चित्रपटातून काढूनही टाकले जाऊ शकते याबद्दल सांगितलं जात होतं. 'राका' टीमनं आता या अटकळांना निराधार ठरवून पूर्णविराम दिला आहे. एका मीडिया स्टेटमेंटमध्ये, टीमनं या सर्व अफवांचे खंडन करत म्हटलं, "सर्व काही योजनेनुसार सुरू आहे. 'राका'मध्ये दीपिकाची खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि सेटवर प्रचंड उत्साहानं शूटिंग सुरळीतपणे सुरू आहे." दीपिका ही सध्या आव्हानात्मक दृश्यांचे चित्रीकरण करत आहे. 'राका' आणि 'किंग' या दोन्ही चित्रपटांचे वेळापत्रकमुळं सध्या ती खूप व्यग्र आहे. यानंतर या रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे, "ती गरोदरपणातही चित्रपटाचं शूटिंग करत आहे.

दीपिका पदुकोणच्या 'राका'बद्दल : 'राका' या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर ॲटली दिग्दर्शित आणि सन पिक्चर्स निर्मित 'राका' हा दीपिका पदुकोण आणि अल्लू अर्जुन यांच्यातील पहिला चित्रपट आहे. अल्लू अर्जुनच्या 44व्या वाढदिवशी चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे, या चित्रपटात अभिनेता हा बोल्ड, टक्कल आणि रांगड्या अवतारात दिसणार आहे. दीपिका आणि अल्लू अर्जुनचा हा आगामी चित्रपट 2027 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. आता अनेकजण या चित्रपटाच्या अपडेटबद्दल वाट पाहात आहेत.

हेही वाचा :

  1. 'व्हाइट लोटस सीझन 4'चा भाग नसणार दीपिका पदुकोण, वाचा सविस्तर...
  2. दीपिका पदुकोणच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशन पार्टीचे व्हिडिओ व्हायरल, वाढदिवशी अभिनेत्रीला मिळाली भेट...
  3. रणबीर कपूरबरोबर दीपिका पदुकोण १० वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार एकत्र, वाचा सविस्तर...