ETV Bharat / entertainment

'व्हाइट लोटस सीझन 4'चा भाग नसणार दीपिका पदुकोण, वाचा सविस्तर...

हिंदी चित्रपटसृष्टीतील दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती हॉलिवूड सीरीज 'व्हाइट लोटस सीझन 4'चा आता भाग नसेल.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण (Getty Images)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : February 27, 2026 at 2:51 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : 'स्पिरिट' आणि 'कल्की 2'नंतर, दीपिका पदुकोणच्या हातातून हॉलिवूड प्रोजेक्ट निघाला आहे. 'व्हाइट लोटस सीझन 4'मध्ये आता ती दिसणार नाही. दीपिका पदुकोणनं ऑडिशन नाकारल्यामुळं 'द व्हाईट लोटस'चा भाग होण्याची संधी गमावली असल्याचं कारण समोर आलंय. अनेक दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की, दीपिका पदुकोण 'व्हाइट लोटस सीझन 4'मध्ये दिसणार आहे. यामुळं तिचे चाहते देखील खुश होते. दीपिका पदुकोणला एका वेगळ्या शैलीत पाहण्यासाठी संधी प्रेक्षकांना मिळाली असती, मात्र आता या सीरीजची भाग नसेल. एमी पुरस्कार विजेता असलेला 'द व्हाईट लोटस' हा शो खूप दमदार आहे.

दीपिका पदुकोण 'द व्हाईट लोटस 4'चा भाग नसेल : रिपोर्टनुसार दीपिका पदुकोणशी या सीरीजशीसंबंधीत संपर्क साधण्यात आला होता. मात्र तिला शोसाठी ऑडिशन देणे अनिवार्य होतं. ती ऑडिशन देऊ इच्छित नव्हती, त्यामुळं आता ती या सीरीजमध्ये नसेल. 'द व्हाईट लोटस'साठी ऑडिशन घेणे हा कास्टिंग प्रक्रियेचा अनिवार्य भाग आहे. दरम्यान या अहवालांवर दीपिका पदुकोण किंवा तिच्या टीमनं कुठलेही अधिकृत विधान आले नाही. जर दीपिका या सीरीची भाग असती तर तिचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय प्रोजक्ट असता. ती 2017मध्ये 'xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाद्वारे दीपिकानं हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्याबरोबर विन डिझेल, क्रिस वू, डोनी येन, नीना डोब्रेव्ह, रुबी रोज, टोनी जा आणि टोनी कोलेट यासारख्या अनेक प्रसिद्ध कलाकार दिसले होते. दरम्यान माइक व्हाईटद्वारे निर्मित, लेखन आणि दिग्दर्शित, 'द व्हाईट लोटस'चा प्रीमियर 11 जुलै 2021 रोजी झाला. या सीरीजला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर या सीरीजचा दुसरा पार्ट आणि तिसरा पार्ट आला.

दीपिका पदुकोणचं वर्कफ्रंट : आता दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ती पुढं 'किंग' या चित्रपटामध्ये शाहरुख खानबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षी 24 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या वेळी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती अ‍ॅटली दिग्दर्शित अल्लू अर्जुन अभिनीत एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचं शीर्षक निश्चित झालेले नाही. तसेच शेवटी दीपिका शेवटची 2024मध्ये आलेल्या 'सिंघम अगेन'मध्ये दिसली होती.

हेही वाचा :

  1. दीपिका पदुकोणच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशन पार्टीचे व्हिडिओ व्हायरल, वाढदिवशी अभिनेत्रीला मिळाली भेट...
  2. रणबीर कपूरबरोबर दीपिका पदुकोण १० वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार एकत्र, वाचा सविस्तर...
  3. ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला संघानं जबरदस्त विजय मिळवल्यानंतर मॅचविनिंग कामगिरी करणारी जेमिमा रॉड्रिग्जनं केला मोठा खुलासा...