'कल्की २८९८ एडी'च्या क्रेडिटमधून दीपिका पदुकोण बाहेर, चाहत्यांनी केली नाराजी व्यक्त...
'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाच्या क्रेडिटमधून दीपिका पदुकोणला काढून टाकले गेले आहे. आता याबद्दल तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहेत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : October 29, 2025 at 2:18 PM IST
मुंबई : नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोणनं धमाकेदार अभिनय केला आहे. या चित्रपटासाठी तिचं कौतुक देखील करण्यात आलं होतं. बॉक्स ऑफिसवर 'कल्की २८९८ एडी' चित्रपटानं धमाकेदार कमाई केली होती. सध्या दीपिका ८ तासांच्या शिफ्टच्या विधानामुळं चर्चेत आहे. तिला पूर्वी 'स्पिरिट' यानंतर 'कल्की २८९८ एडी'च्या सीक्वेलमधून बाहेर काढून टाकण्यात आलं. आता 'कल्की २८९८ एडी'च्या निर्मात्यांनी असं काही केलंय, ज्यामुळं दीपिकाचे चाहते त्यांच्यावर भडकले आहेत.
'कल्की २८९८ एडी'च्या क्रेडिटमधून दीपिका काढून टाकेल : नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओवर 'कल्की २८९८ एडी' चित्रपट पाहणाऱ्या वापरकर्त्यांनी दीपिकाचं क्रेडिटमधून नाव गायब असल्याचं सांगितलं आहे. आता दीपिकाचे चाहते आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. एका चाहत्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'क्रेडिट म्हणजे फक्त चित्रपटाच्या शेवटी नावे नसतात. ती ओळख, जबाबदारी आणि कामाबद्दलचा आदर असते, 'कल्की' च्या भावनिक गाभ्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी दीपिका पदुकोणसारखी अभिनेत्री, ओटीटीवर रिलीज झाल्यानंतरही क्रेडिटमधून गायब आहे. '
credits aren’t just names at the end of a movie. They’re acknowledgment, accountability, and respect for the work put in. When someone like Deepika Padukone, who’s played a pivotal role in shaping the emotional core of Kalki, isn’t credited even after months of OTT release pic.twitter.com/IcQOe0qSmW
— Dua Padukone (@Duapadukone) October 28, 2025
दीपिका पदुकोणची मागणी : दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'एक्स'वर अधिकृतपणे घोषणा होती की, दीपिका पदुकोण आता प्रभास स्टारर चित्रपटाच्या सीक्वेलचा असणार नाही. निर्मात्यांनी एक्सवर पोस्ट केली होती, "आम्ही काळजीपूर्वक विचार करून हा निर्णय घेतला आहे. पहिला चित्रपट बनवण्याचा दीर्घ प्रवास असूनही, आम्ही भागीदारी तयार करू शकलो नाही. आम्ही तिला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो." दीपिकानं २५% फी वाढ आणि ८ तासांच्या कामाच्या शिफ्टची मागणी केली असा दावा करण्यात आला, ज्याला निर्मात्यांनी नकार दिला. वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर, निर्मितीनं तिला चित्रपटातून काढून टाकल्याची बातमी ही समोर आली होती. दरम्यान दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रंबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं शाहरुख खानबरोबर 'किंग' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय ती साऊथ स्टार अल्लू अर्जुनबरोबर 'AA22xA6' यामध्येही दिसणार आहे.
हेही वाचा :

