Vasant More Resigns : मी माझ्या हाताने परतीचे दोर कापले; मनसेच्या राजीनाम्यानंतर वसंत मोरे यांची पहिली प्रतिक्रिया

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 6:54 PM IST

thumbnail

पुणे Vasant More Resigns : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More)  यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. त्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या मनातली खंत मांडली. तसंच आपण पक्ष का सोडला ते सगळं वसंत मोरे यांनी सांगितलंय. तसंच मी परतीचे दोर कापून टाकले आहेत. त्यामुळं मी मनसेत परतण्याचा काही प्रश्न येणार नाही. माझी भूमिका मी दोन ते तीन दिवसांत मांडेन असंही वसंत मोरे यांनी म्हटलंय. 

इच्छुकांची गर्दी वाढली : मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी (Loksabha Election 2024) इच्छुक आहे असं म्हटल्यानंतर जाणून बुजून पक्षानं लोकसभा निवडणूक लढण्यास अनुकूल वातावरण असल्याचा अहवाल देण्यात आला. मी लढत असल्यानं इच्छुकांची गर्दी वाढली. वसंत मोरे एकनिष्ठच आहे, परंतु हे वरिष्ठांना सांगितलं तर त्यांना खोटं वाटत होतं. त्यामुळं किती दिवस अखेर अन्याय सहन करायचा, असं त्यांनी म्हटलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.