''मुंबईत येणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या'', कोल्हापूरचा 'शाहिरी आवाज' घुमणार

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 5:11 PM IST

thumbnail

कोल्हापूर Shahir Sawant Story : 'आरक्षण द्या नाहीतर खाली करा खुर्च्या, नाहीतर झोंबतील कोल्हापूरच्या मिरच्या' अशा शाहिरी फटक्यातून साद घालत कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत आपल्या पथकासह मुंबईच्या दिशेने आज रवाना झाले. (Maratha Reservation) मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचे हात बळकट करण्यासाठी शाहिरीच्या माध्यमातून ते रान उठवणार आहेत. यामुळे आता मराठा आरक्षण लढ्याच्या मैदानात कोल्हापूरचा पहाडी शाहिरी आवाज घुमणार आहे. (Lakh Maratha)

जरांगेंचा आमरण उपोषणाचा निश्चय : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावातून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. 26 जानेवारी पर्यंत ते मुंबईत पोहोचतील यानंतर आझाद मैदानावर आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करण्याचा त्यांचा निश्चय आहे. (Shaheer Dilip Sawant) त्यांच्या या लढ्याला पदयात्रा मार्गावर अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी आज पुण्याच्या दिशेने रवाना झाले. मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या पद यात्रेत सकल मराठा समाज सहभागी होणार आहे. (Jarange Hunger Strike Mumbai)

शाहीर दिलीप सावंतही मुंबईत धडकणार : कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत आपल्या पथकासह चित्ररथ घेऊन लवाजम्यासह मुंबईकडे वाटचाल करणार आहेत. मराठा आरक्षण लढ्यात रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आता आंदोलन मार्गावर शाहिरी हुंकार अवघ्या महाराष्ट्राला ऐकायला मिळणार आहे. शाहिरीच्या माध्यमातून राज्य सरकारला शाहीर सावंत यांनी 'आरक्षण द्या नाहीतर खाली करा खुर्च्या, नाहीतर झोंबतील कोल्हापूरच्या लवंगी मिरच्या' असा जणू दमच भरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.