अयोध्येत श्रीरामाचा जल्लोष ; सूर्यकिरणांनी उजळले रामलल्लाचे ललाट, पाहा व्हिडिओ - Ayodhya Ram Navami 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 5:02 PM IST

thumbnail

उत्तर प्रदेश (अयोध्या) Ayodhya Ram Navami 2024 : देशभरात आज रामनवमीचा सण (Ram Navami) मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अयोध्येत राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उभारणीनंतर "रामलल्ला"ची ही पहिलीच रामनवमी आहे. त्यामुळं यावेळी रामललाची विशेष पूजा करण्यात आलीय. रामलल्लाचा पंचामृतानं अभिषेक करण्यात आला. त्यानंतरचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो 'सूर्यतिलक'! (Ram lalla Surya Tilak Ceremony) यानंतर दुपारी 12.16 वाजता पाच मिनिटे रामलल्लाची "सूर्य टिळा" पूजा करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 6.00 वाजता भव्य शृंगार आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. 

मंदिरात बसविण्यात आली विशिष्ट यंत्रणा : अयाेध्येतील श्रीराम मंदिराची रचना एका विशिष्ट पद्धतीनं करण्यात आली आहे. त्यात एक अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे, ज्यामुळं श्रीरामलल्लांच्या मूर्तीच्या ललाटवर श्रीरामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणांचा स्पर्श हाेईल.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.