सरकार मराठ्यांना आरक्षणावर अडवून ठेवलंय, प्रकाश आंबेडकर यांची टीका

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 5:49 PM IST

thumbnail

पुणे Prakash Ambedkar On Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत यायला निघाले आहेत. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले आहेत. सरकार आणि मनोज जरांगे यांची चर्चा सुरू आहे. पण ती यशस्वी होत नाहीये. त्यावर आता शासनाने योग्य ती पावले उचलावी. सरकारने आडमुठेपणा करू नये, मनोज जरांगे आझाद मैदानावर गेले तर काय होईल, काहीही होणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. मनोज जरांगे यांना लोणावळ्यात सध्या चर्चेसाठी अडवून धरण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. पुढे आंबेडकर म्हणाले की, कोर्टानं आपली आदब राखली पाहिजे. भांडणात कोर्टने लक्ष घालू नये.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.