पिंपरी चिंचवड शहरातील मोकळ्या जागेत भीषण आग: ऑइलच्या बॅरलमुळं स्फोट

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 4:23 PM IST

thumbnail

पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी न्यायालयाजवळील मोकळ्या जागेत भीषण आग लागली आहे. गेल्या दीड तासापासून आग धुमसत आहे. या आगीमुळं परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. तसंच या ठिकाणपासून काही अंतरावर विविध औद्योगिक कंपन्या आणि नागरिकांची घरे आहेत. त्यामुळं औद्योगिक कंपन्या कचरा मोरवाडी न्यायालयाजवळील मोकळ्या जागेत टाकतात. याच औद्योगिक कचऱ्याला आग लागली असावी, असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. मोकळ्या जागेतील कचऱ्याला आग लागल्यानं आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सात अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनानं योग्य काळजी घ्याला हवी, अशी नागरिकांनी  मागणी केलीय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.