महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांनी पाळला 'काळा दिवस' - Maharashtra Day 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 4:40 PM IST

thumbnail

नागपूर Maharashtra Day 2024 : आज संपूर्ण राज्यभरात 'महाराष्ट्र दिन' (Maharashtra Din) उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, दुसरीकडं महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात विदर्भवाद्यांनी 'काळा दिवस' (Black Day) पाळला आहे. १ मे १९६० पासून विदर्भावर, विदर्भातील शेतकरी आणि तरुणांवर अन्याय सुरू असल्याचा आरोप विदर्भावाद्यांनी केला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं, व्हेरायटी चौक येथे काळ्या पट्ट्या बांधून आणि काळे कपडे घालून रास्ता रोको करण्यात आला. तसंच वेगळ्या विदर्भ राज्याचे झेंडे धरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. विदर्भाचे बहुतांशी आमदार हे पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई समोर आवाजसुद्धा काढत नाही, विदर्भासाठी निधी आणत नाहीत. म्हणून विदर्भाचा विकास होत नसल्याचा आरोप, यावेळी विदर्भवाद्यांनी केला. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.