"खोटं बोललं की बाप्पा कान कापतो, मोदी सरकारकडून घोर निराशा"; खास मुलाखतीत अमोल कोल्हेंची चपराक - Amol Kolhe Interview

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 7:48 PM IST

Updated : Apr 20, 2024, 8:09 PM IST

thumbnail

पुणे Amol Kolhe Interview : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) वारं वाहतंय. सर्वच पक्षाचे नेते प्रचारात दंग झालेत. आरोप, प्रत्यारोप, टीका, दावे अशा विविध अंगांनी राजकीय वातावरण तापलंय. लोकसभा निवडणूक, राष्ट्रवादी बंड, अजित पवार वाद, आढळराव पाटील अशा विविध विषयांवर खासदार अमोल कोल्हे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत खास संवाद साधला.

शिरुर मतदारसंघाकडं सर्वांचं लक्ष : लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून, सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार होत आहे. राज्याचं नव्हं तर देशाचं लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency) खासदार अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार आढळराव पाटील (Adhalrao Patil) यांच्यात लढत होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हे यांना थेट आवाहन दिल्यानंतर या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. यंदाच्या निवडणुकीबाबतीत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "ही निवडणूक जनतेनं हातात घेतलीय. लोक आता बिनधास्त सांगत आहेत की, यंदा आम्ही तुतारी वाजवणारच आहोत."

Last Updated : Apr 20, 2024, 8:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.