ETV Bharat / state

वादळी वाऱ्याने हाहाकार; दोन चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू, अंत्यविधीला गर्दी, अश्रूंचा फुटला बांध - Unseasonal Rain

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 7:11 PM IST

Unseasonal Rain: राज्यात एकीकडं कमालीची उष्णता, अचानक होणारा वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain) आणि सतत बदलणारं वातावरण यामुळं महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत आलाय. तर दुसरीकडं छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात दोन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळामुळं दोन दिवसांमध्ये तिघांचा मृत्यू झालाय.

Unseasonal Rain
वादळी वाऱ्याने हाहाकार

छत्रपती संभाजीनगर Unseasonal Rain : दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळात तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. रविवारी मध्यरात्री अचानक वादळी वारे वाहू लागले अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर कुठे पत्रे उडाले. या वादळामुळं दोन दिवसांमध्ये तिघांचा मृत्यू झालाय. यात ४८ वर्षीय इसमासह दोन लहान मुलांचा समावेश आहे. मालमत्तांचे नुकसान तर झालेच मात्र, जीवित हानी देखील मोठ्या प्रमाणात झाल्यानं तीन कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



सोमवारी रात्री चिमुकल्याचा मृत्यू : शनिवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसात एका लहान फुटबॉलपटू खेळाडूला आपला जीव गमवावा लागला. दक्ष अभय वारे (वय ८) असं या चिमुकल्याच नाव आहे. दक्ष हा फुटबॉलपटू व्हायचं म्हणून दर्गा परिसरात एका कोचिंगसाठी जात होता. शनिवारी सायंकाळी तो सराव करत असताना अचानक वादळी वारे वाहू लागले, यात एक पत्रा उडाला आणि दक्षता अंगावर जाऊन पडला. त्यात त्याला जबर मार लागला. छातीला, डोक्याला आणि पायाला पत्रा कापल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारचालकानं हा प्रकार पाहिला आणि त्याच्या मदतीला ते धावले. दक्षला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पायाला जबर मार लागल्यानं आता पाय कापावा लागणार अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती, कुटुंबीयांनी तसा निर्णय ही घेतला. मात्र, डोक्याला मार लागल्यानं सोमवारी सायंकाळी या चिमुकल्याची प्राणज्योत मावळली.


सोलर टाकी पडल्यानं चिमुकलीचा मृत्यू : छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसराला शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यानं 2 जणांचा मृत्यू झालाय. शिवाजीनगर भागात एका 4 वर्षाच्या मुलीचा सोलर हिटरची टाकी पडल्यानं अंत झाल्याची घटना घडली. अदिती झा असं या चीमुकलीचं नाव आहे. शनिवारी रात्री वादळी वारे वाहत असताना गारखेडा भागात घरावर लावलेले सोलर टाली उडाली आणि बाजुच्या घरात राहणाऱ्या अदितीच्या अंगावर पडली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली, तिला रुग्णालयात घेऊन जाई पर्यंत तिचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे सोमवारी तिचा चौथा वाढदिवस साजरा केला जाणार होता, त्यासाठी अनेक नातेवाईक घरी आले होते. वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्यांना तिच्या अंत्यविधी करावा लागल्याचं दुर्दैव घडलं. तर अंगावर भिंत पडून शैलेंद्र तिडके (वय ४८) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. त्यामुळं वादळामुळं मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाल्याचं पाहायला मिळालंय.



मोठ्या प्रमाणात नुकसान : दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला होता. शिवाय जिल्ह्यात अनेक भागात झाडे उमळून पडली, तर काही ठिकाणी घरावरची पत्रे उडून अनेकांचे संसार उघड्यावरती पडले होते. शहरातील उल्कानगरी, गारखेडा, सेवनहिल, सातारा, देवळाई हा परिसरसह वीजपुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना त्रासाला समोर जावं लागलं.

हेही वाचा -

  1. झारसुगुडा बोट अपघात: ओडिशात बोट उलटून सात प्रवाशांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता - Jharsuguda Boat Mishap
  2. झेलम नदीत बोट उलटून दुर्घटना, चार जणांचा मृत्यू - boat capsizes in Jhelum
  3. कर्ज काढून घेतली दुचाकी ; फायनान्स कंपनी कर्मचाऱ्यांच्या मारहाणीतून सुटला अन् तलावात पडून तरुणानं गमावला जीव - Youth Died In Pond
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.