ETV Bharat / state

सायन रुग्णालय परिसरातील 'हिट अँड रन' प्रकरण; आरोपी डॉ. राजेश डेरे जामिनावर मुक्त - Sion Hospital Accident

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 8:47 PM IST

Updated : May 27, 2024, 6:06 PM IST

Sion Hospital Accident : सायन हॉस्पिटलचे डॉ. राजेश डेरे (Rajesh Dere) यांच्या कारनं शुक्रवारी एका महिलेला धडक दिली. या अपघातात 60 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉ. राजेश डेरे यांना अटक करण्यात आली होती. आज आरोपी डॉ. राजेश डेरे यांची जामिनावर सुटका करण्यात आलीय.

Sion Hospital Accident
60 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू (Etv Bharat Reporter)

मुंबई Sion Hospital Accident : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरण ताजं असतानाच शुक्रवारी (24 मे) सायन हॉस्पिटलच्या आवारात हॉस्पिटलचे डॉ. राजेश ढेरे (Rajesh Dere) यांच्या कारनं धडक दिल्यानं एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांना (Rajesh Dere) भोईवाडा न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. अगोदर राजेश डेरे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर त्याची 20 हजार रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका करण्यात आलीय.

काय घडलं होतं : मुंब्रा येथील जुबेदा शेख या 60 वर्षीय वृद्ध महिला तिच्या उपचारांसाठी रुग्णालयात आली होती. रुग्णालयाच्या गेट क्रमांक 7 जवळ ही महिला झोपली होती. त्यावेळी तिथून जात असलेल्या डॉ. डेरेंच्या वाहनाने तिला उडवलं होतं. जखमी महिलेला उपचारांसाठी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. मात्र बेशुध्द असलेल्या या महिलेचा उपचारांदरम्यान मूत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यावर सीसीटीव्ही चित्रिकरण तपासण्यात आले. त्यावेळी या प्रकरणातील आरोपी डॉ. डेरे यांना पोलिसांनी अटक केली होती.

जामिनावर केली सुटका : सुरुवातीला रुग्णालय प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिस तपासानंतर याबाबत माहिती समोर आलीय. अपघातानंतर उशिराने डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती. रविवारी न्यायालयासमोर डेरे यांना हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने पोलिस कोठडीऐवजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर 20 हजार रुपयांच्या जामिनावर त्याची मुक्तता करण्यात आली.

डॉक्टर चालकाला अटक : सायन पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता महिलेचा सायन हॉस्पिटल ओपीडी बिल्डींगच्या समोर 7.45 वाजेच्या सुमारास कार क्रमांक एम एच 04 एल एक्स 5777 नं अपघात झाल्याचं समोर आलं. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा शाहनवाज शेख यानं केलेल्या तक्रारीनंतर, सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायन हॉस्पिटलचे डॉ. राजेश डेरे यांना अटक करण्यात आली होती.

हेही वाचा -

रस्त्यात नव्हे आता थेट रुग्णालय आवारात 'हिट अँड रन', वृद्ध महिलेच्या मृत्यूप्रकरणी सायन हॉस्पिटलच्या डीनला अटक - Mumbai Sion Accident

पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडवर; शहरातील 49 पब आणि बारवर कारवाई - Action Against Pubs And Bar In Pune

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन; वरिष्ठांना वेळेत माहिती न दिल्याचा ठपका - Pune Hit and Run

Last Updated : May 27, 2024, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.