ETV Bharat / state

भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 10:47 AM IST

Updated : Feb 23, 2024, 10:57 AM IST

Rajendra Patni Passed Away : भाजपाचे वाशिम जिल्ह्यातील कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज सकाळी निधन झालं. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Rajendra Patni Passed Away
आमदार राजेंद्र पाटणी

वाशिम Rajendra Patni Passed Away : भाजपाचे कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. राजेंद्र पाटणी यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून राजेंद्र पाटणी हे दीर्घ आजारानं ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यातच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानं भाजपानं वाशिममधील सुसंस्कृत राजकारणी गमवला आहे.

राजेंद्र पाटणी यांचं निधन : भाजपाचे कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांना मागील काही दिवसांपासून दीर्घ आजारानं ग्रासलं होतं. त्यांच्यावर वाशिमच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील काही दिवसांपासून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. या आजारातून आमदार राजेंद्र पाटणी हे बाहेर येतील अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. मात्र आज सकाली त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. राजेंद्र पाटणी यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली आदरांजली : कारंजाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झाल्यानं त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. याबाबतची माहिती भाजपाच्या वरिष्ठांना कळताच त्यांनाही मोठा धक्का बसला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. देवेंद्र फडणवीस यांनी "अत्यंत दुःखद बातमी, विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो," अशी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हेही वाचा :

  1. राजकारणातील 'कोहिनूर' हरपला; मनोहर जोशी यांचं मुंबईत निधन
  2. भिक्षुकी ते लोकसभा अध्यक्ष; मनोहर जोशींची थक्क करणारी 'संघर्षगाथा'
Last Updated :Feb 23, 2024, 10:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.