ETV Bharat / state

न्यायाधीशांचा फोटो व्हॉट्सॲप डीपीवर टाकून लुटले पैसे - Online Fraud

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 10:44 PM IST

Online Fraud : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा फोटो व्हॉट्सॲप डीपी ठेऊन एकाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Online Fraud
Online Fraud (Reporter ETV Bharat)

मुंबई Online Fraud : मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा फोटो डीपी वापरून ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 419, 420 तसंच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 क व 66 ड अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी दिली आहे.

आझाद मैदान पोलीसात गुन्हा : आझाद मैदान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनं मुंबई उच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांचा फोटो व्हॉटसअप प्रोफाईलला ठेऊन बनावट अकाउंट तयार केलं होतं. त्यानंतर त्यानं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर येथील सचिवांना फोन करत 50 हजार रुपये तातडीनं पाठवण्याचं सांगितलं होतं. सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांनी 'फोन 'पे' व्दारे 50 हजार रुपये पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे सेंड झाले नाहीत. त्यावर त्यांनी आरोपीनं त्यांच्या पत्नीला पैसे पाठविण्यास सांगितलं. त्यानंतर, आणखी पैशांची मागणी करण्यात आल्यानं हा फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर उच्च न्यायालयातील पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली.



हे वाचलंत का :

  1. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडवर; शहरातील 49 पब आणि बारवर कारवाई - Action Against Pubs And Bar In Pune
  2. पेनाला सोन्याचा भाव; इटलीत तयार झालेला पेन थेट कोल्हापुरात, किंमत जाणून डोळे होतील पांढरे - Pen Festival in Kolhapur
  3. आरटीई घोटाळ्यातील आरोपीचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या महिलेला अटक, मुख्य आरोपी मात्र अजूनही फरारच - RTE Scam Nagpur
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.