ETV Bharat / state

लोकसभा प्रचारासाठी विदर्भात योगी आणि मोदींच्या सभांचा धडाका, भाजपाला मोठा फायदा होणार; फडणवीसांचा दावा - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 4:27 PM IST

फाईल फोटो
फाईल फोटो

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाकरिता आता अवघे 8 दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा वातावरणात भाजपने संपूर्ण लक्ष हे विदर्भावर केंद्रीत केलं आहे. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे दोन नेते भाजपसाठी करिष्माई नेतृत्व असल्याने जास्तीत जास्त सभा आणि रोड शो करत वातावरण निर्मिती करण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला आहे.

देवेंद्र फडणवीस

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात विदर्भातील सर्व दहा जागांवर मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने टॉपच्या नेतृत्वाला विदर्भावर लक्ष देण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर आणि रामटेक लोकसभा लोकसभे मतदारसंघात जाहीर सभा घेत आहेत. तर, योगी आदित्यनाथ हे वर्धा जिल्ह्यातील रामटेक आणि नागपुरात सभा घेणार आहेत. येत्या दिवसांमध्ये या सभा आणखी वाढणार आहेत.

10 ला मोदी रामटेकमध्ये : नागपूर येथील उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची नागपूर जिल्ह्यातील कन्हांन येथे जाहीर सभा होणार आहे. याशिवाय मोदी दुसऱ्या टप्यात सुद्धा महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी विदर्भात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, नरेंद्र मोदीं यांच्या सभेनंतर वातावरण बदलत असतं. महाराष्ट्रात एनडीएला अनुकूलता आहे. मात्र, नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेनंतर अनुकूलता आणखी वाढेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

योगीच्या सभांमधून वातावरण निर्मिती : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुद्धा भाजपने प्रचारासाठी विदर्भाच्या मैदानात उतरवलं आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या पाच पैकी वर्धा, नागपूर आणि भंडारा या तीन मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांच्या सभेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्यात देखील योगी आदित्यनाथच्या सभांचा धडाका सुरू राहणार आहे.

पाऊसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता : नागपूर, रामटेक, वर्धा यासह पूर्व विदर्भात काल रात्रभर मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात अवकाळी पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या रामटेक येथील सभेत पाऊस व्यत्यय निर्माण करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

1 अखेर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर, वाचा संपूर्ण यादी - lok Sabha election 2024

2 'त्या' प्रश्नावरून नवनीत राणा म्हणाल्या, " नवरा बायकोमध्ये भांडण लावू नका" - lok Sabha election 2024

3 सावित्रीबाई फुले विद्यापीठात मुलाला मारहाण : चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Student Beaten In Pune University

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.