ETV Bharat / state

कांदा निर्यातीचा पुन्हा वांदा, 'या' कारणानं जेएनपीटी बंदराबाहेर अडकले 400 कंटेनर - onion export issue

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 11:24 AM IST

onion export issue
onion export issue (Source -ETV Bharat Reporter)

कांदे निर्यातीचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदराबाहेर 400 हून अधिक कंटेनर खोळंबले आहेत.

नाशिक- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घाईघाईनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवली. मात्र निर्यातीनंतर चार दिवस जेएनपीटीचे संकेतस्थळ अपडेट झाले नाही. निर्यातीवरील कराराबाबत स्पष्टता येऊ शकली नाही. परिणामी तब्बल 400 हून अधिक कंटेनर मुंबईच्या बंदरा बाहेरच खोळंबले होते.

मंगळवारी दुपारी संकेतस्थळ अपडेट झाले. त्यानंतर जवळपास 50 टक्के कंटेनर हे मार्ग मार्गस्थ झाले. मात्र अजूनही 50 टक्के कंटेनर खोळंबले आहेत. पुढील दोन-तीन दिवसात हे कंटेनर मार्गस्थ होतील, असा विश्वास निर्यातदारांनी व्यक्त केला आहे. मुंबईच्या जेएनपीटी येथे 400 हून अधिक कंटेनर खोळंबल्याचा फटका नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये बघायला मिळाला. जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांदा दरात पुन्हा 400 ते 500 रुपयाची घसरण बघायला मिळाली. मंगळवारी कांद्याचे दर प्रति क्विंटल दर 1700 ते 1800 रुपयेपर्यंत आले. दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारनं 8 डिसेंबर 2024 ला निर्यात बंदी लादली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

निर्यातीवरील कराराबाबत स्पष्टता नाही-लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्होट बँकेवर डोळा ठेवून केंद्र सरकारनं 5 महिन्यांनी कांदा निर्यातीला परवानगी दिली. मात्र, 4 मेपासून किमान निर्यात मूल्य प्रति टन 550 डॉलर आणि त्यावर 40 टक्के कर लावला. त्यानंतर बाजार समितीतील दरात 500 ते 600 रुपयांनी वाढ झाली होती. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करून निर्यातीला चालना दिली होती. परंतु संकेतस्थळ बंद असल्याने मुंबईतील जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना निर्यातीवरील कराराबाबत स्पष्टता नसल्यानं निर्यात ठप्प झाली.

सुरळीत होण्याला 2 दिवस लागण्याची शक्यता- "नाशिकच्या जानोरीतील दीडशे ते पावणे दोनशे कंटेनर जेएनपीटीबाहेर आहेत. निर्यात सुरळीत होण्यासाठी दोन दिवस लागण्याची चिन्ह आहेत," असं महाराष्ट्र राज्य कंटेनर मालक संघटनेचे सदस्य भारत शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा-

  1. कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार - Devendra Fadnavis On Onion Exports
  2. कांद्यावरील निर्यातबंदी हटवली खरी पण जबर निर्यात शुल्क लागू, महायुतीच्या उमेदवारांना होणार का फायदा? - onion exports
  3. हा तर दुजाभाव, गुजरातच्या कांद्याला परदेशात निर्यातीची परवानगी, महाराष्ट्राच्या कांद्याला मात्र निर्यातीस नकार - permission to export Gujarat onions
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.