ETV Bharat / state

मिटकरींनी दिलेलं चॅलेंज आव्हाडांनी स्वीकारलं; मात्र, 'तुतारी' वाजवण्यासाठी ठेवली अट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 8:54 PM IST

MLA Amol Mitkari
MLA Amol Mitkari

MLA Amol Mitkari : केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला 'तुतारी' चिन्ह दिल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात अमोल मिटकरी यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना 'तुतारी' वाजवण्याचं आव्हान देत, एक लाखाचं बक्षीस देणार असल्याचं सांगितलं. हे आव्हान स्वीकारत आव्हाड यांनी रायगडावर 'तुतारी' वाजवली. मात्र, आता मिटकरी यांनी आणखी एक अट घातली आहे.

अमोर मिटकरी यांची प्रतिक्रिया

अकोला MLA Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगानं 'तुतारी' चिन्ह बहाल केलं आहे. त्यानंतर आज रायगडावर शरद पवार यांच्या हस्ते या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. मात्र, या 'तुतारी' चिन्हावरुन शरद पवार यांच्या पक्षाच्या चिन्हावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केलीय. आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना 'तुतारी' वाजवण्याचं आव्हान दिलं होतं.

‘"जितेंद्र आव्हाड यांनी आव्हान स्वीकारलं, हे खोटं आहे. आव्हाड यांनी स्वतः 'तुतारी' वाजवली असं दिसत नाही. कारण आव्हाडांच्या मागे उभे असलेले लोक 'तुतारी' वाजवत आहेत. - आमोल मिटकरी, आमदार

आव्हाडांनी तुतारी वाजवली : आमदार जितेंद्र आव्हाडांनी तुतारी वाजल्यासं मी एक लाख रुपये देईन’, असं आव्हान, आमदार अमोल मिटकरी यांनी दिलं होतं. त्यानंतर आज रायगडावर शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ या चिन्हाच्या अनावरणप्रसंगी आव्हाड यांनी तुतारी वाजवून मिटकरींचं आव्हान स्वीकारल्याची चर्चा होती. यानंतर अमोल मिटकरी यांनी आव्हाड यांनी एकट्यानं तुतारी वाजवून दाखवल्यास त्यांना एक लाखाचा चेक देण्यात येईल, असं आव्हान दिलं आहे.

माझं उत्तर तयार : आव्हाडांचा तुतारी वाजवतानाचा व्हिडिओ दाखवताना त्यांचं पोट पुढं आल्याची टीका देखील मिटकरी यांनी केली आहे. तसंच पाठीमागून कुणीतरी तुतारी वाजवत आहे. आव्हाडांनी माझं आव्हान स्वीकारलं तर, मीही माझं उत्तर द्यायला तयार आहे. मी त्यांना एक लाखाचा चेक द्याला तयार आहे. त्यांनी तुतारी आणून पत्रकारांसमोर वाजवून एक लाख घेऊन जावे, असं आव्हान त्यांनी केलं. यावेळी मिटकरी यांनी व्हिडिओमध्ये चेकही दाखवला. पण, मिटकरी यांनी दाखवलेल्या धनादेशात मोठी चूक दिसून येत आहे. त्यामुळं आता धनादेश लिहिण्याच्या पद्धतीमुळं मिटकरी चर्चेत आले आहेत.

जितेंद्र आव्हाडांनी स्वीकारलं आव्हान : अमोल मिटकरी यांचं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी स्वीकारलं आहे. शरद पवार यांच्या हस्ते रायगडावर 'तुतारी' चिन्हाचं आज अनावरण करण्यात आलं. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी 'तुतारी' वाजवून दाखवली. त्यामुळं मिटकरी आव्हाडांना एक लाख रुपयांचे बक्षीस देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

हे वाचलंत का :

  1. नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का : अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात 55 माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश
  2. वरळी कुणाचाही बालेकिल्ला नाही, राहुल नार्वेकर यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
  3. "तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, पण महाराष्ट्रात", चंद्रकांत पाटलांची टोलेबोजी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.