ETV Bharat / state

"भाजपाला आता राज ठाकरेंची गरज भासली, इतके दिवस...."; रवींद्र धंगेकरांचा हल्लाबोल - Ravindra Dhangekar On Raj Thackeray

Ravindra Dhangekar On Raj Thackeray : पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून संपूर्ण प्रचारादरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळाले. पुण्यातील स्थानिक प्रश्न ते देशातील विकासाचे मुद्दे यावर पुण्यात प्रचारादरम्यान महायुती तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यावर आज महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Ravindra Dhangekar On Raj Thackeray
राज ठाकरे (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 5:40 PM IST

पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचाराविषयी बोलताना रवींद्र धंगेकर (Reporter)

पुणे Ravindra Dhangekar On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यातील सभेत फतवा काढत मी देखील माझ्या हिंदू समाजातील लोकांना फतवा काढतो की, महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणा असं राज ठाकरे काल (10 मे) म्हणाले. यावर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, काल आपण जर राज ठाकरे यांची सभा ऐकली तर त्यांनीच पुण्यातील प्रश्नांवर बोट ठेवलं आणि मग त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पक्षातील अजेंडा समोर केला; पण ते असं बोलले की, कमळला मतदान करा. तसेच भाजपाला आज राज ठाकरे यांची गरज भासली असून इतके दिवस हेच भाजपाचे लोक राज ठाकरे यांना विचारत देखील नव्हते. राज ठाकरे हे भाजपाच नव्हे तर त्यांच्याच पक्षाचा प्रचार करण्यासाठी आले होते, असं यावेळी धंगेकर म्हणाले.

जनता भाजपाच्या मागे उभी राहणार नाही : पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचाराबाबत रवींद्र धंगेकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत या मोदी सरकारने फसवण्याचा प्रकार केला आहे. तसेच महागाई, बेरोजगारी तसेच देशातील इतर प्रश्न असतील यात भाजपाने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. यामुळे देशातील जनता ही भाजपाच्या मागे उभी राहणार नाही. तसेच आज पुणे शहरात भाजपाकडून देशातील नेत्यांपासून ते राज्यातील महायुतीच्या सर्वच नेते मंडळी यांना प्रचारासाठी यावं लागत आहे. तसेच गेली दोन दिवस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात असून अनेक बैठका घेत आहे. माझं म्हणणं आहे की, फडणवीस यांनी निकालापर्यंत पुण्यात थांबून पुण्याचा निकालच घेऊन जावा.

पुणे हे शाहू, फुले, आंबेडकर यांचं शहर : कालच्या मनसेच्या सभेत अभिनेता प्रवीण तरडे यांनी काही लोकांकडून पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. यावर धंगेकर यांना विचारलं असता ते म्हणाले की पुणे शहर शाहू, फुले, आंबेडकर यांचं शहर असून सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारं शहर आहे. हाच पुण्याचाही इतिहास आहे. कोणी जर असा प्रयत्न केला तर जनता तो हाणून पाडेल. आज एसीमध्ये बसणाऱ्या लोकांना रस्त्यावर यावं लागलं असून जनतेच्या उमेदवाराला पुणेकर हे जिंकून देतील असं यावेळी धंगेकर म्हणाले.

लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना मुरलीधर मोहोळ (Reporter)

2019 पेक्षा जास्त लीड मला मिळेल- मुरलीधर मोहोळ : पुणे लोकसभेसाठी 13 तारखेला मतदान होणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आजपर्यंत साठ दिवस झाले. प्रचार सकाळी सात पासून सुरू आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. विकासाची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी ही लोकसभेची निवडणूक आहे. व्यक्तिगत भेटीगाठी करणं शक्य नसलं तरी जितकं शक्य आहे तेवढं केलेलं आहे. मला विश्वास आहे की, 2019 पेक्षा जास्त लीड मला मिळेल आणि मी निवडून येईल, असा विश्वाससुद्धा मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी - मुरलीधर मोहोळ : राज ठाकरे यांनी काल हिंदू म्हणून मी फतवा काढतो की, मोहोळ यांना मतदान करा असं म्हणत उद्धव ठाकरे, काँग्रेस मुस्लिम मतदारावरसुद्धा टीका केली होती. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, जातीपातीचं राजकारण करणं धर्माधर्माच राजकारण करणं हे काम इंडिया आघाडी कडून आणि काँग्रेस कडून होत आहे. त्या सगळ्यांचा विचार करून तसे नियोजन येत्या काळात आम्ही करणारच आहोत. त्यामुळे आता मतदान जवळ असताना धर्माधर्मात भांडण लावण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.

हेही वाचा :

  1. नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी खोदले जाणार सहा फुट खोलीचं खंदक; कारण काय? - lok sabha election
  2. मणिपूरमधील 'शबरीं'चा अपमान झाला, तेव्हा पंतप्रधान चूप का, प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
  3. मोदींनी मला डोळा मारला, पण...; उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका - lok sabha election

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.