ETV Bharat / state

स्वाइन फ्लू आणि डेंग्यू रुग्णांची माहिती दडवणाऱ्या 650 रुग्णालयांवर होणार फौजदारी कारवाई - Swine Flu And Dengue Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 8:02 PM IST

Swine Flu And Dengue Case : गेल्या काही महिन्यांपासून नाशिक येथे 'स्वाइन फ्लू' आणि 'डेंग्यू'च्या रुग्ण संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. तर 'स्वाइन फ्लू' (Swine Flu) आणि 'डेंग्यू'च्या रुग्णांची (Dengue Patients) माहिती दडवल्यामुळं 650 रुग्णालयांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिला आहे.

Swine flu
स्वाइन फ्लू (Maharashtra Desk)

नाशिक Swine Flu And Dengue Case : 'स्वाइन फ्लू' (Swine Flu) आणि 'डेंग्यू' संबंधित (Dengue Patients) रुग्णांची होणारी वाढ त्यात बाधित असल्याची चाचणी केल्यानंतर माहिती नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळवली जात नसल्यानं, शहरातील 650 रुग्णालयांवर 'साथरोग प्रतिबंधक कायदा 1897' अंतर्गत भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 188 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा, नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिलाय.

आरोग्य यंत्रणा झाली सतर्क : नाशिक जिल्ह्यात डेंग्यू नियंत्रणात असला तरी स्वाइन फ्लूचे जानेवारी ते एप्रिल दरम्यान 23 बाधित रुग्ण आढळले होते. ग्रामीण भागातही 18 रुग्णांची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यात स्वाइन फ्लूमुळं शहरातील एका डॉक्टरांचा तर ग्रामीण भागातील पाच रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. अशात खाजगी हॉस्पिटल स्वाइन फ्लू झाल्याची माहिती दडवत असल्याचं महानगरपालिकेचं म्हणणं आहे. याआधी देखील शहरातील 650 रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आली होती. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नसल्यानं आता महानगरपालिकेने थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतलीय.



या संघटनांना पत्र दिले : नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रायव्हेट मेडिकल असोसिएशन, फॅमिली प्रॅक्टिशनर असो, सातपूर-अंबड डॉक्टर असोसिएशन, आय एम ए, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन या संघटनांना पत्र लिहलं आहे.



लक्षणे आढळल्यास रुग्णालयाशी संपर्क साधावा : सिन्नर तालुक्यातील दातलीच्या महिले पाठोपाठ मालेगावच्या महिलेचा स्वाइन फ्लूनं मृत्यू झाला. रुग्णांना काही लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता रुग्णालयात संपर्क साधावा. हलका आहार घ्यावा, जास्त थंड पाणी पिऊ नये, घसा खवत असल्यास तातडीनं आरोग्य केंद्रात जावे असं आवाहन, महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केलंय.




रोज माहिती देणं बंधनकारक : नाशिक शहरातील खाजगी रुग्णालयात स्वाइन फ्लूचा रुग्ण दाखल झाल्यानंतर रोज त्याची माहिती देणं बंधनकारक आहे. 650 रुग्णालयांना पत्र काढून माहिती तत्काळ देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती, नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिलीय.


ही आहेत लक्षणे : स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या लक्षणांमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. यात ताप, सर्दी, थंडी, घसादुखी अंगदुखी, खोकला, पोटदुखी, उलटी, जुलाब, मळमळ अशा लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळं स्वाइन फ्लू टाळण्यासाठी वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावे, पौष्टिक आहार घ्या, आवळा, मोसंबी, संत्री आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा, पुरेशी झोप घ्यावी. तसेच रुग्णांनी मास्कचा वापर करावा असं आवाहन, नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागानं केलंय.

हेही वाचा -

  1. नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूने मालेगावच्या महिलेचा मृत्यू, आरोग्य विभाग सतर्क - Swine Flu At Nashik
  2. नाशिक : 'स्वाइन फ्लू'च्या रुग्णांची माहिती दडवली, 650 रुग्णालयांना महापालिकेकडून नोटीस - swine flu
  3. Pigs Infected With Swine Flu: बुलडाण्यात शेकडो डुकरांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू, बाधित क्षेत्रातील जिवंत डुकरे करणार नष्ट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.