ETV Bharat / state

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत वाढ, 29 मे पर्यंत सुनावली कोठडी - Bhavesh Bhinde Police Custody

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 6:17 PM IST

Bhavesh Bhinde Police Custody : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील प्रमुख आरोपी असलेल्या भावेश भिंडेच्या (Bhavesh Bhinde) पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. भिंडेला आज दुपारी आझाद मैदान जवळील मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात (किल्ला कोर्टात) हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत 29 मे पर्यंत वाढ केली.

Bhavesh Bhinde Police Custody
भावेश भिंडे (ETV Bharat Reporter)

मुंबई Bhavesh Bhinde Police Custody : भिंडेला विक्रोळी न्यायालयासमोर 17 मे ला हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. त्याची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली.

सुनावणी किल्ला कोर्टात पार पडली : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील प्रमुख आरोपी असलेल्या भावेश भिंडेच्या (Bhavesh Bhinde) पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. भिंडेला आज (26 मे) दुपारी आझाद मैदान जवळील मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात (किल्ला कोर्टात) हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत 29 मे पर्यंत वाढ केली. भिंडेला विक्रोळी न्यायालयासमोर 17 मे ला हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. त्याची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. पोलिसांनी भिंडेला राजस्थानच्या जोधपूर मधून अटक केली होती आणि विक्रोळी न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने सुनावणी किल्ला कोर्टात झाली.

घाटकोपर दुर्घटनेत 17 जणांनी गमावलेत प्राण : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांनी प्राण गमावले आहेत. दुर्घटना घडल्यानंतर भिंडे मुंबई सोडून फरार झाला होता. सुरुवातीला तो लोणावळा येथे गेला होता; मात्र पोलीस त्याच्यापर्यंत पोचण्यापूर्वीच तो लोणावळा येथून पळाला होता. पुढे त्याला राजस्थानमधील जोधपूर येथून मुंबई पोलिसांनी अटक केली. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आहे. घाटकोपर येथील होर्डिंग आणि इतर होर्डिंगद्वारे मिळणारा आर्थिक लाभ भिंडेच्या व्यक्तिगत खात्यातर्फे वापरण्यात येत होता. याबाबत अधिक तपास करण्यासाठी भिंडेला पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली. ती मान्य करून भिंडेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली.


'अ‍ॅक्ट ऑफ गॉड' असल्याचा बचाव पक्षाचा पवित्रा : घाटकोपर दुर्घटनेनंतर भिंडेच्या मालकीचे दादर येथील होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले. त्यासाठी नोटिस देण्यात आली नव्हती, याकडे वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. ही दुर्घटना मानवी दुर्लक्षामुळे नव्हे तर 'अ‍ॅक्ट ऑफ गॉड'मुळे घडल्याचा दावा केला. भूकंप, पूर, नैसर्गिक संकट अशा मानवी नियंत्रणाच्याबाहेर असलेल्या कृतींचा अ‍ॅक्ट ऑफ गॉडमध्ये समावेश केला जातो. त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा :

  1. आयपीएलच्या अंतिम सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला इतिहास रचण्याची संधी; आतापर्यंत तीनवेळा 'असं' घडलं - KKR vs SRH
  2. "बाळासाहेब असते तर यांना जोड्यांनी बडवलं असतं", मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल - CM Eknath Shinde Interview
  3. गडकरींविरोधात मोदी, शाह आणि फडणवीसांचा कट; राऊतांच्या आरोपावर काय म्हणाले महायुतीतील नेते? - Sanjay Raut News
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.