ETV Bharat / state

आम्ही नाही तर देशाचे पंतप्रधान सेल्फीचं प्रमोशन करतात, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 3:38 PM IST

Supriya Sule On Ajit Pawar: खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि वैचारिक भूमिका स्पष्ट केली.

Supriya Sule On Maratha Reservation
सुप्रिया सुळे

प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे

पुणे supriya sule On Ajit Pawar : मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्ट 2023 पासून मनोज जरांगे पाटील वारंवार उपोषण करत आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीनं सरकारला अहवाल सादर करण्यात आला. आयोगानं सरकारला जो अहवाल सादर केला आहे, त्यावर चंद्रलाल मेश्राम यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेवरदेखील खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.


...हा भातुकलीचा खेळ नाही : बारामतीतून सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यावर खासदार सुळे म्हणाल्या की, "हा काय भातुकलीचा खेळ नाही. माझं काम एका जागेवर आणि नाती दुसरीकडं आहे. प्रोफेशनल वेगळं आणि नाती वेगळी आहेत. माझी नाती पवार, सुळे यांच्या पुरते मर्यादित नाहीत. आज अनेक नाती प्रेमाचे, विश्वासाचे असतात. नाती नेहमी राहतील. पण माझी एक वैचारिक बैठक आहे. माझी लढत वैयक्तिक नसून वैचारिक आहे. आज मी वैचारिक लढाई लढत असल्याचं" खासदार सुळे यांनी सांगितलं.

बारामती निवडणूकबाबत मायबाप जनता ठरवेल की, काय करायचं आहे. आमचं सगळं कुटुंब राजकारणात नाही. आमच्या कुटुंबाला तुम्ही राजकारणात कशाला आणता? दादा बोलले असतील तर तुम्ही त्यांनाच विचारा-खासदार सुप्रिया सुळे

बारामती निवडणूकबाबत मायबाप जनता ठरवणार : बारामतीत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर सेल्फी काढण्याबाबत टीका केली. याबाबत त्या म्हणाल्या की, "पंतप्रधान यांनीच एक ऑर्डर काढली होती. प्रत्येक कॉलेजमध्ये सेल्फी काढा. आम्ही नाही तर देशाचे पंतप्रधान सेल्फीचं प्रमोशन करत आहेत. तसेच संसद आमच्यासाठी एक इमारत नसून एक विचार आहे. ते लोकशाहीचं मंदिर आहे. भाषण करण्यासाठी तर संसद असते. आम्हाला त्यासाठी तर तिथं पाठवल जातं.

मराठा समाजाला फसवलं : आरक्षणासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "मेश्राम यांनी केलेले आरोप खूपच गंभीर आहे;. एक तर सभासद सोडून गेले, काहींना काढून टाकलं आहे. जे सभासद अशा पद्धतीनं आरोप करत असतील तर हे खूपच चुकीचं आहे. जसं धनगर समाजाला फसवलं तसं मराठा समाजालादेखील फसवण्याचा काम सरकार करत असल्याचं लोक म्हणत आहेत."



समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित : "झारखंड राज्यानेदेखील जातीनिहाय जनगणना बाबत पाऊल उचल आहे. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "आज धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. धनगर समाजाला आरक्षण देऊ असं फडणवीस बारामतीमध्ये येऊन बोलले होते. तसच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन उभ्या राज्याने पाहिलं आहे. गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता असूनही आज आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. पक्षाच्या नावाबाबत न्यायालयीन सुनावणीबाबत सुळे म्हणाल्या की, "ज्या माणसानं पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीनं पक्षाचं चिन्ह हिसकावून घेतलं आहे. अदृश्य शक्तीनं संविधानाची चिरफाड केली आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यामुळं पक्ष त्यांनाच मिळायला हवा."

हेही वाचा -

  1. "बारामतीत आमच्या उमेदवाराला विजयी करा, अन्यथा मी...", अजित पवारांचा कार्यकर्त्यांना अल्टिमेटम
  2. आमदार अपात्र झाले तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ, ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून तो काढून घेतात यावर काय अपेक्षा करायची - सुप्रिया सुळे
  3. आरोप करायचे अन् पक्षात प्रवेश द्यायचा, ही भाजपाची स्टाईल; चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.