ETV Bharat / state

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरुन ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता; छगन भुजबळांनी केला 'हा' मोठा दावा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2024, 4:19 PM IST

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक होऊन ठराव मंजूर करण्यात आले. (Maratha Reservation Notification) मात्र, ओबीसी नेते बबन तायवाडे यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन नसल्याचं सांगितलं. (OBC leaders) यावर, मी एकटा नसून माझ्यासोबत करोडो ओबीसी बांधव असल्याचं म्हणत छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Difference opinion among OBC
भुजबळांचा दावा

ओबीसी आरक्षणाच्या अधिसूचनेविषयी बोलताना मंत्री छगन भुजबळ

मुंबई Chhagan Bhujbal : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतल्यामुळं कुणबी नोंदी असलेल्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. (Baban Thaiwade) या सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसीतून तीव्र विरोध केला जात आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर देत निर्णयावर आक्षेत घेतला आहे.

तायवाडे-भुजबळ एकमत नाही : मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी देण्यात येणाऱ्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मसुदा हा जुन्या मसुद्याप्रमाणेच आहे. त्यामुळे ओबीसीत वाटेकरी वाढली जाणार नाही. 57 लाख मराठा समाजात कुणबी नोंदी आढळल्या असून या जुन्या नोंदी आहेत. त्यामुळे नव्याने वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांची संख्या कमी आहे. छगन भुजबळ यांच्या भूमिकेला आपलं समर्थन नसून सरकारने सध्या घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांना याविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आमच्यात वेगवेगळ्या जातीचे 374 वाटेकरी होते. त्यांना सामावून घेतलं आहे. आता हजार वाटेकरी झाले आहे. त्यामुळे 374 वाटेकरी यांचा हक्क कमी होणार आहे. ओबीसीच्या 54% मध्ये आणखी 20 ते 25 टक्के घुसवले. शाहू महाराजांनी सांगितले होते की, आरक्षण देता येणार नाही. 374 जातींचं आरक्षण संपल्यात जमा असल्याचं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही बोलतो असं छगन भुजबळ म्हणाले आहे.

काल नव्हते ते राहणार बैठकीला उपस्थित : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांकडून विरोध केला जात आहे. ओबीसी एल्गार मेळावा आणि पुढील रणनीतीसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी काल ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. आज देखील जे नेते काल उपस्थित नव्हते त्यांच्या सोबत आज बैठक होणार असल्याची माहिती स्वतः छगन भुजबळ यांनी दिली. काल जे नेते उपस्थित होते ते नेते आज उपस्थित राहणार आहेत. हरकती नोंदवायच्या आहेत. या संदर्भात चर्चा होईल. जाहीर सभा होणार त्या नियोजनाबाबत चर्चा होईल. ओबीसी यात्रा काढायची आहे. त्या संदर्भात देखील कमिटी नेमलेली आहे. रूट आणि दिवस कोणता असेल याबाबत देखील काम करण्याची तयार सुरू आहे. मी कसलं एकाकी पडलो. माझ्यासोबत करोडो ओबीसी बांधव सोबत असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.


कोणत्याही पदाची अभिलाषा नाही : ओबीसीमध्ये जाणीवपूर्वक करोडो लोक बॅकडोअरने घुसवतात. हे जाणीवपूर्वक आहे का? येथे मंत्र्याचा मंत्रिमंडळाचा आणि सरकारचा कसला संबंध नाही. इथे माझ्या ओबीसी समाजाचं आरक्षण समाप्त होतय. त्याची आग आमच्या मनात भडकत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा भेटेल तेव्हा मी सांगणार की, आग कशी कमी करणार आहात. आपण सरकारमध्ये राहून लढा देणार आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, याबाबत सरकारनं आणि माझ्या पक्षानं ठरवावं. मुख्यमंत्र्यांनी ठरवावं त्याची आपल्याला चिंता नाही. मला कुठल्याही पदाची अभिलाषा नसल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हणत सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरळ जाऊन सांगा, तुम्ही याला काढा म्हणून असे उद्‌गार देखील छगन भुजबळांनी काढले आहे.

हेही वाचा :

  1. सत्तापालट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींंची बिहारमध्ये 'भारत जोडो न्याय यात्रा', काँग्रेसनं आखली रणनीती
  2. भारताची संस्कृती आणि भारतीय लोक इतिहासाच्या पलीकडे- योगी आदित्यनाथ
  3. गुन्ह्यातील पीडितांच्या मदतीसाठी 'गोट बँक', सहा जिल्ह्यात राबवली जात आहे संकल्पना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.