ETV Bharat / state

बिल गेट्स यांनाही चहाची भुरळ; नागपुरात प्रसिद्ध 'डॉली चायवाल्या' सोबत केली 'चाय पे चर्चा'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 1:03 PM IST

Updated : Feb 29, 2024, 1:13 PM IST

Dolly Chaiwala : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स सध्या भारतात आहेत. त्यांनी बुधवारी नागपुरात डॉली चायवाल्याची भेट घेतली. इतकचं नव्हे तर त्यांनी त्यांच्या इन्टाग्रामवर या भेटीचा एक व्हिडिओही शेअर केलाय.

बिल गेट्स यांनाही चहाची भुरळ; नागपूरात प्रसिद्ध 'डॉली चायवाल्या'सोबत केली 'चाय पे चर्चा'
बिल गेट्स यांनाही चहाची भुरळ; नागपुरात प्रसिद्ध 'डॉली चायवाल्या'सोबत केली 'चाय पे चर्चा'

नागपूर Dolly Chaiwala : आपल्या देशात गेल्या काही वर्षात चहा आणि चायवाला दोन्ही शब्द अधूनमधून कानी पडत असतात. अशातच नागपूरचा प्रसिद्ध चायवाला डॉलीची क्रेज सोशल मीडियावर दिवसेंदिवस वाढतच आहे. डॉलीच्या चहाची चव जितकी न्यारी आहे, त्यापेक्षा तो ज्या प्रकारे चहा देतो तो अंदाज मात्र जगावेगळा आहे. डॉली म्हणजे नागपूरचा सेलिब्रिटी. त्याच्या फॅन लिस्ट मध्ये शेकडो नावं आहेत. आता यात एक नवीन नाव समाविष्ट झालय. ते म्हणजे प्रसिद्ध बिल गेट्स यांचं. डॉली आणि बिल गेट्स यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बिल गेट्स यांनी स्वतःच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केल्यानं आज डॉली पुन्हा प्रकाशझोतात आलाय.

10 वर्षांपासून विकतो चहा : डॉलीचं खरं नाव सुनील मारोती पाटील असं आहे. मात्र, तो त्याच्या स्टाईलमुळे ​​डॉली नावानं प्रसिद्ध आहे. सदर भागातील ओल्ड व्हीसीए मैदानाजवळ तो चहा विकतो. 'डॉली की टपरी' या नावानं त्याची चहाची टपरी संपूर्ण देशभर प्रसिद्ध झालीय. 29 वर्षीय डॉली गेल्या 10 वर्षांपासून चहा विकतोय. डॉली नेहमीच कॅप्टन जॅक स्पॅरोच्या लूकमध्ये दिसतो त्याची स्टाइल ग्राहकांना नेहमीचं आकर्षित करत आलीय.



स्टाईल आयकॉन डॉली : डॉलीवर हॉलिवूड अभिनेत्याचा प्रभाव असला तरी तो कधी रजनीकांत स्टाईल तर कधी दाक्षिणत्य अभिनेत्यांच्या स्टाईलमध्ये चहा देतो. तर कधी गाणी ऐकताना त्याच्या ग्राहकांना चहा देतो. डॉली व त्याच्या चहाचे चाहते इतके प्रचंड आहेत की, अनेक वेळा त्याच्या चहाच्या स्टॉलवर येणारे ग्राहक सेल्फी घेतल्याशिवाय जातच नाही.


हजारो कप चहाची विक्री : डॉलीची आगळीवेगळी शैली आता देशभरात प्रसिद्ध झालीय. डॉलीनं बारावीपर्यंत शिक्षण घेतलंय. त्याच्या कुटुंबात सात भाऊ आणि आई आहे. डॉलीमुळं घरातील सदस्यांना ही ओळख मिळाली. डॉली आपल्या स्टाईलनं आणि कठोर परिश्रमानं दररोज हजारो कप चहा विकतो.

हेही वाचा :

  1. बिल गेट्स यांची भुवनेश्वरच्या झोपडपट्ट्यांना भेट; अनेक कार्यक्रमांना राहणार उपस्थित
  2. Sachin Tendulkar Bill Gates Meet : सचिन तेंडुलकरने घेतली बिल गेट्स यांची भेट.. दोघांनी तयार केलाय मोठा 'प्लॅन'
Last Updated : Feb 29, 2024, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.