ETV Bharat / state

मेळघाटात अनेकांनी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री घेतला निसर्ग अनुभव, कोणाला दिसला वाघ तर अनेकांना दिसले रानगवे - Melghat Tiger Reserve

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 11:11 AM IST

Updated : May 25, 2024, 12:32 PM IST

MELGHAT TIGER RESERVE बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गप्रेमींना मचणावरून वाघाचे दर्शन झाले. मेळघाट वाघ्र प्रकल्पातर्गत यावर्षी विविध ठिकाणी मचाणांची व्यवस्था करण्यात आली होती.

MELGHAT TIGER RESERVE
मेळघाट व्याघ्र प्रकल्प (ETV Bharat)

निसर्गप्रेमींना मचणावरून वाघाचे दर्शन (ETV Bharat repoeter)

अमरावती MELGHAT TIGER RESERVE : बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्खप्रकाशात उजळून निघालेल्या मेळघाटचे किड्यांच्या किर्र आवाज मचाणावर बसून निसर्गप्रेमींनी रात्रभर अनुभवला. व्याघ्र प्रकल्पाच्या 'निसर्ग अनुभव' या उपक्रमांतर्गत निसर्गप्रेमींसाठी दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ही खास व्यवस्था करण्यात येते. विषेश म्हणजे यावर्षी र्मेळघाटच्या जंगलात पुणे आणि मुंबई येथील अनेक निसर्गप्रेमी सहभाग नोंदवला.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अकोला वन्यजीव विभागात ज्ञानगंगा काटेपूर्णा आणि कारंजा मोहोळ या जंगलात एकूण 23 ठिकाणी मचाणींची व्यवस्था करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागात टिपेश्वर जंगलात 40 ठिकाणी मचाण उभारण्यात आले होते. तसेच अमरावती जिल्ह्यातील गुगामल वन्यजीव विभागात एकूण 32 ठिकाणी जंगलामध्ये निसर्गप्रेमींनी मचाणीवर बसून रात्रीचा थरार अनुभवला. अकोट वन्यजीव विभाग अंतर्गत अंबाबरवा वाण, धारगड, सोमठाणा, आणि नरनाळा या घनदाट जंगलात एकूण 44 ठिकाणी मचाणांची व्यवस्था होती. तसेच अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या मेळघाटात एकूण 35 मचाणी घनदाट जंगलात उभारण्यात आल्या.

टिपेश्वरच्या जंगलात दिसले सहा : मेळघाटातील घनदाट जंगलात अनेक वाघ असले तरी उंच पहाड आणि डोंगरदर्‍याने वेढलेल्या या जंगल परिसरात वाघ सहसा दिसत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वरच्या जंगलात मात्र, यावेळी रात्री निसर्गप्रेमींना एकूण सहा वाघ दिसल्याची नोंद झाली आहे. चिखलदरा लगत वैरागच्या जंगलात तसेच सीमाडोहच्या जंगलात अनेकांना अस्वल आणि रानगवे दिसले.

सलग तीन तास रानगवे मचणासमोर : बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलात अधून-मधून अनेकदा आवाज यायचे. यावेळी थोडासा रिमझिम पाऊसदेखील बरसला. पहाटेच्या सुमारास मात्र, हरणांचा कळप आणि मोर मोठ्या संख्येत आमच्या मचाणासमोर दिसल्याचे धारगच्या जंगलात मचाणावर असणाऱ्या प्राध्यापक डॉ. स्वाती दामोदरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. नागपूर येथील अनुप लांबट हे चिखलदरा लगतच्या मेमना जंगलात मचाणावर होते. सलग तीन तास रानगवे आमच्या मचाणासमोर असल्याची माहिती त्यांनी दिली. "सेमाडोहच्या जंगलात पहिल्यांदाच रात्रभर मचाणावर बसून घनदाट जंगलातील रात्र कधीही न विसरणारी होती. रात्रभर वन्य प्राण्यांचे आवाज येत होते. जंगलात आज झालेली पहाट ही अप्रतिम अनुभव असल्याचे छायाचित्रकार मनीष तसरे यांनी सांगितले. चिखलदारालगत वैरागच्या जंगलात मचाणावरून रात्री रानगवे पाहिले. थंडी घारवा आणि चंद्राचा लख्ख प्रकाश असा निसर्गाचा आगळावेगळा अनुभव आम्ही घेतला," निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकार मनीष जगताप यांनी सांगितले.

वनविभागकडून केली जाते व्यवस्था : वनविभागाकडून उत्तम व्यवस्थाराज्यभरातील वन्य जीव प्रेमी बुद्ध पौर्णिमेनिमित्त खास मेळघाटच्या जंगलात आले होते. या सर्व निसर्गप्रेमींची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्यावतीनं विशेष व्यवस्था करण्यात आली. गत महिनाभरापासून निसर्गप्रेमींना जंगलात बसण्यासाठी मजबूत असे मचाण व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने उभारण्यात आले. तसेच रात्रीच्या जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आली. एका मचाणावर दोन व्यक्तींसह व्याघ्र प्रकल्पाचा एक कर्मचारी तैनात होता.

हेही वाचा

  1. वाघ समोर आल्यानंतर भीती नव्हे आनंद, 160 पर्यटकांनी घेतला व्याघ्रगणना अनुभव - buddha purnima
  2. मास्टर ब्लास्टरला जंगल सफारीचं वेड! पहिल्याच दिवशी तारा, बबली, बिजली आणि युवराजची सचिन ला सलामी
Last Updated : May 25, 2024, 12:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.