ETV Bharat / state

मनोज जरांगे यांनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार : अन्न पाणी घेणार नसल्याचा दावा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 12:25 PM IST

Updated : Feb 10, 2024, 1:34 PM IST

Maratha Reservation Row : मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवली सराटीतून आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.

Maratha Reservation Row
संपादित छायाचित्र

आंदोलक मनोज जरांगे

जालना Maratha Reservation Row : मराठा आरक्षणासंदर्भात सरकार ठोस भूमिका घेत नसल्यानं आज अखेर सरकारला दिलेला इशारा मनोज जरांगे यांनी पूर्ण केला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं सकाळी साडेदहा वाजता पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज सुरू केलेल्या आंदोलनात मनोज जरांगे यांनी अन्न पाणी आणि उपचारही घेणार नसल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

काय आहेत मनोज जरांगे यांच्या नवीन मागण्या : "सरकारनं विशेष अधिवेशन बोलवून या सत्रामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा. आंदोलनादरम्यान आंतरवाली सराटीसह राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ परत घ्यावे, माझ्या उपोषणादरम्यान मला राज्य मंत्रिमंडळातले सहा ते सात मंत्री भेटण्यासाठी आले होते. माझं उपोषण ज्यावेळी त्यांनी सोडलं, त्यावेळी त्यांनी मला शब्द दिला होता की राज्यातील मराठा आंदोलनाच्या वेळी दाखल झालेले सर्व गुन्हे आम्ही तात्काळ मागं घेऊ, पण अद्यापपर्यंत ते गुन्हे सुद्धा मागं घेण्यात आले नाहीत. राज्यात 57 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या मराठा बांधवांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र सरकारनं द्यावी."

समाजासाठी छगन भुजबळांचं काय योगदान आहे : मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी छगन भुजबळ यांना धोका असल्याची माहिती दिली आहे. छगन भुजबळ यांना एक निनावी पत्र आलं असून त्यामध्ये त्यांना धमकवण्यात आलं आहे. त्या दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांना पोलीस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी "छगन भुजबळ यांना कोण मारणार ? छगन भुजबळ यांचं समाजासाठी काय योगदान आहे. ते आता म्हातारे झालेले आहेत," अशा शब्दात मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.

माझ्यावर करण्यात आला होता हल्ला : "माझ्यावर सुद्धा किल्ल्यावर हल्ला करण्यात आला होता, पण ती बातमी मी समोर येऊ दिली नाही. पण आता शेवटी मला ते सांगावं लागत आहे. गड किल्ल्यावर मी दर्शनासाठी गेलो असता, त्या ठिकाणी माझ्या गाडीवर ट्रक टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित पोलिसांनी आम्हाला बाहेर काढलं. मग आम्ही सुद्धा सुरक्षा द्यावी, अशी मागणी करायला पाहिजे होती. पण आम्ही तशी मागणी केली नाही, कारण आम्ही मर्द मराठे आहोत," असं मत मनोज जरांगे यांनी आज आमरण उपोषणात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे.

अन्न, पाणी, उपचार घेणार नाही : या आमरण उपोषणात मनोज जरांगे यांनी अन्नत्याग आणि पाणीत्याग करणार असल्याचा दावा त्यांनी केला. औषध उपचार सुद्धा घेणार नसल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. दोन दिवसात विशेष अधिवेशन सरकारनं घेऊन हा कायदा पारित करावा, या मागणीसाठी हे आमरण उपोषण असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन - भुजबळ
  2. महाराष्ट्रातील 10-20 जन सरकारची सुपारी घेऊन मराठा समाजाविरोधात बोलत आहेत - मनोज जरांगे पाटील
  3. मराठा आंदोलक मनोज जरांगे अन् मंगेश चिवटे यांच्यात बंद दाराआड खलबतं
Last Updated : Feb 10, 2024, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.