ETV Bharat / state

राष्ट्रवादीला सात जागावर लढण्याचा प्रस्ताव? अजित पवार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - NCP meeting

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 6:34 PM IST

Updated : Mar 24, 2024, 7:03 PM IST

LOK SABHA ELECTIONS : महायुतीच्या जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरली आहे. आज अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीला 7 जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार, मंत्री उपस्थित होते.

LOK SABHA ELECTIONS
LOK SABHA ELECTIONS

मुंबई LOK SABHA ELECTIONS : लोकसभा निवडणूक जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये अजून अंतिम निर्णय झालेला नाही. शनिवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. मात्र या बैठकीतूनही जागा वाटपाचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. शनिवारी रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत बैठक चालली. तीन तास बैठकीत जागा वाटपावरून चर्चा झाली, मात्र यातून कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची आज (रविवारी) देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत 7 जागावर लढण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

कोणत्या आहेत सात जागा? : आजच्या बैठकीत सात जागा जागावर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली. यात सात जागांमधील बारामती, शिरूर, रायगड, सातारा, धाराशिव, परभणी, गडचिरोली या सात जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही सात जागांचा प्रस्ताव महायुतीसमोर ठेवला आहे. भाजपालाही सात जागांचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. या सात जागांचा प्रस्ताव देखील काल (शनिवारी) अजित पवार यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत अमित शाह यांच्यासमोर मांडला आहे.

साताऱ्याची जागा कुणाकडं? : एकीकडे सातारा लोकसभा मतदारसंघावरून साताऱ्याचे राजे उदयनराजे भोसले मागील तीन दिवसापासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. साताऱ्याची जागा आपणाला मिळावी, असं उदयनराजे यांनी भाजपातील वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आहे. मात्र, यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरीकडं साताऱ्यातील जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव आजच्या बैठकीत ठेवण्यात आला. कारण सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. इथं मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा गट आहे. याव्यतिरिक्त उदयनराजेंना इथून तिकिट दिलं गेलं, तरी त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असंही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पुढं येतेय. महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसताना, दुसरीकडं महायुतीत साताऱ्याच्या जागेवरुन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुतीतील जागा वाटपातचा निर्णय हा होळीनंतरच होणार असल्याचीही माहिती मिळतेय.

हे वाचलंत का :

  1. "शकुनी मामामुळंच 'वंचित'...."; नितेश राणेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप - Nitesh Rane On Sanjay Raut
  2. संविधानावर हल्ला करणाऱ्यांचे होळीमध्ये दहन करणं हे आमचं कर्तव्य-संजय राऊत - Sanjay Raut new
  3. नागपुरात नितीन गडकरींविरोधात ठाकरे काँग्रेसचा 'विकास' करणार का? - Nagpur Lok Sabha Constituency
Last Updated : Mar 24, 2024, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.