ETV Bharat / state

'या' तारखेला लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा अंदाज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 9:27 PM IST

Updated : Mar 1, 2024, 3:08 PM IST

Lok Sabha Elections 2024 candidate cannot be lured by religion to ask for votes otherwise action will be taken
अप्पर मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे

Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केलीय. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (29 फेब्रुवारी) मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सोलापुरात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासन कशा पद्धतीनं काम करणार यासंदर्भात माहिती दिली.

सोलापूर Lok Sabha Elections 2024 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या तारखा लवकरच जाहीर होतील. याच पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी (29 फेब्रुवारी) सोलापुरात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. "कोणत्याही प्रकारच्या अफवांना आणि अपप्रचाराला जिल्हा प्रशासन थारा देणार नाही. तसंच कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्रीकांत देशपांडे यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत धर्माचा वापर करत प्रचार करता येणार नाही. धर्माच्या आधारावर, धर्माचे आमिष दाखवून मतं मागता येणार नाही," असं त्यांनी स्पष्टं केलं

धर्माचा आधार घेत निवडणूकीत मतं मागणाऱ्या उमेदवारांवर बारीक लक्ष : यावेळी बोलत असताना श्रीकांत देशपांडे म्हणाले की,"मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये धर्माचा वापर करून मतं मागता येत नाही,अशी तरतूद आहे. निवडणूक आयोगाकडं तसे अधिकारदेखील आहेत. एखादा उमेदवार हा धर्माचा वापर करून प्रचार करत असेल किंवा प्रक्षोभक भाषण करत असेल तर निवडणूक आयोग संबंधित उमेदवाराला निवडणूक काळात प्रचार करण्यास बंदी करू शकतं. तसंच आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धर्माचा आधार घेऊन मतं मागणाऱ्या उमेदवारांवर निवडणूक आयोग लक्ष देणार आहे", असं त्यांनी सांगितलं.

आचारसंहिता कधी लागणार? : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही येणाऱ्या 15 मार्चच्या आसपास लागेल, अशी शक्यता श्रीकांत देशपांडे यांनी वर्तवली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 मार्च दरम्यान जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळं भारत निवडणूक आयोगाकडून 15 मार्चदरम्यान निवडणुकीची घोषणा होईल, असा त्यांनी यावेळी अंदाज व्यक्त केला. पुढं ते म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग अतिशय कडक धोरण अवलंबणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 80 वर्षापुढील वृद्धांना आणि चाळीस टक्क्यावर दिव्यांग असलेल्या मतदारांना घरात बसून पोस्टल मतदान करता येणार आहे," अशी त्यांनी यावेळी माहिती दिली.


हेही वाचा -

  1. मुंडे, महाजन, मुनगंटीवार लढणार नाहीत लोकसभा निवडणूक, 'हे' आहे मुख्य कारण
  2. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर शिंदे गटाचा दावा..उदय सामंत यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलं मोठं वक्तव्य
  3. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई, पिस्टलसह दहा जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक
Last Updated :Mar 1, 2024, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.