ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीत कोळी बँड पथकाला 'अच्छे दिन'; पियुष गोयल यांच्या 'त्या' कृतीनंतर बँडला 'डिमांड' - LOK SABHA ELECTION 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 9:13 PM IST

कोळी बँड पथक
कोळी बँड पथक (ETV Bharat Reporter)

Lok Sabha Election 2024 : मुंबईतील सर्वपक्षीय प्रचारात कोळी बँड पथकाची मागणी प्रचंड वाढलीय. उमेदवारी अर्ज दाखल करण्यारपासून ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन असो किंवा कुठलीही प्रचार यात्रा असो यात ही बॅड पथकं दिसू लागली आहेत.

मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलीय. मुंबईतील सर्वच सहाही मतदार संघात प्रचारानं जोर धरलाय. पण यंदा या प्रचारात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवतेय ती म्हणजे कोळी बॅड पथकाची. मुंबईतील सर्वपक्षीय प्रचारात कोळी बँड पथकाची मागणी प्रचंड वाढलीय. उमेदवारी अर्ज दाखल करण्यारपासून ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन असो किंवा कुठलीही प्रचार यात्रा असो यात ही बॅड पथकं दिसू लागली आहेत. पियुष गोयल यांच्या मासळी बाजारात नाकाला रुमाल लावून जाण्याच्या घटनेनंतर मासे आणि कोळी समाज हा अचानक प्रकाश झोतात आलाय.

कोळी टोपी घालून वाद्य वाजवण्याला जास्त मागणी : मुंबईत निवडणूक जिंकायची असेल तर इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा मुद्दा विसरुन चालणार नाही, हे आता उमेदवारांच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. त्यामुळं मुंबईचे मूळ भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजबांधवांकडे उमेदवारांनी लक्ष दिलंय. या समाजाला आकर्शित करण्यासाठी आता प्राचारात कोळी बॅड पथकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. यासंदर्भात बोलताना वर्सोवा गावातील डोंगरीकर पथकाचे वादक उपकार डोंगरीकर म्हणतात की, निवडणुकीच्या काळात आमच्या बँड पथकाला मागणी असतेच! पण या वेळी जरा जास्तच आहे. आम्ही मच्छिमारी करुन जोड धंदा म्हणून बँड पथकात काम करतो, या वर्षी कमाई चांगली झालीय. कारण मागणी खूप आहे. आमची कोळी टोपी घालून वाद्य वाजवण्याला जास्त मागणी आहे.

पियुष गोयल यांच्या कृतीनंतर कोळी बॅडच्या मागणीत वाढ : पियुष गोयल यांच्या एका कृतीमुळं भूमिपुत्रांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. मुंबईत शेकडो वर्षांपासून राहणारा कोळी समाजाबद्दल त्यांच्या समस्यांबद्दल बोललं जाऊ लागलं. मग या समाजाला आकर्षित करण्याची चढाओढ सुरु झाली. या प्रयत्नात प्रत्येक पक्षातले उमेदवार सहभागी झाले. अनेक ठिकाणी या समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देण्यास सुरुवात झाली. याचाच एक भाग म्हणजे कोळी समाजाचा पारंपारिक बँड अनेक ठिकाणी या बँन्डला आमंत्रित करुन आपण कोळी समाजाला आदर आणि सन्मान देत असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून करण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी कोळीवाड्यात प्रचारा दरम्यान एका उमेदवारानं मासळीचा वास येतो म्हणून नाकाला रुमाल लावला. हा मुद्दा कोळी मतदारसंघात चर्चेचा विषय होताना दिसतो आहे. एकंदरीत मुंबईतील कोळी लोकांना समाविष्ट करून, कोळी बँड पथक यांचा जास्तीत जास्त उपयोग करुन मतदारांना आकर्षित करण्या करिता कोळी बँडची मागणी या लोकसभा निवडणुकीत वाढल्याचं दिसतंय.

लोकसंगीत आणि कोळीगीतांचा होतोय वापर : कोळी समाजाचे वर्सोव्यातील नेते प्रदीप टापके याबाबात बोलताना म्हणाले की, मतदारांना आकर्षित आणि उत्साहित करण्यासाठी मुंबईमध्ये प्रामुख्यानं कोळी ब्रास बँडचा उपयोग होताना दिसतोय. लोकसंगीत आणि कोळीगीतं तसंच त्या तालावर नाचविण्याचं कसब कोळी बँड पथकात असतं हे अनेकदा सिद्ध झालंय. मुंबईचे आद्य नागरिक कोळी आहेत, सात बेटाच्या या मुंबई नगरीत अनेक कोळी वस्त्या आहेत. नरिमन पॉईंट ते दहिसरपर्यंत अनेक कोळी पाडे असून त्यांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. संगीत, नाच, गाणी ही कोळी परंपराच आहे. त्यातूनच कोळी तरुण मुलं बँड पथक चालवतात. कोळी संगीताची धून अलगदपणे मनामध्ये भरुन जाते. त्यामुळं ही गोष्ट राजकीय उमेदवारांनी बरोबर हेरली. कोळी बँडच्या तालावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोळी बँडचा वापर वाढताना दिसतोय. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बहुतेक उमेदवारांनी कोळी बँडचा उपयोग केल्याचं यावेळी पाहावायला मिळालं. कोळी तरुण मुलं मनापासून बँड वाजवत असतात, साधारण एका पथकात वीस ते तीस वादक असतात. ढोल, ड्रम, करनेट, ट्रॅम्प्फेट यांचा भरपूर उपयोग कोळी बँड पथकात केला जातो.

हेही वाचा :

  1. मोठ्या थाटामाटात 'जागतिक गाढव दिन' साजरा, गाढवांसाठी महिलांनी केलं खाद्य जमा - World Donkey Day
  2. मेळघाटात निलगिरीच्या झाडांवर लटकले असंख्य 'उलटे पक्षी'; कीटक नियंत्रणात महत्त्वाची भूमिका - Important role of bats
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.