ETV Bharat / state

निवडणुकीत बंदोबस्तासाठी असलेल्या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू; शासकीय इतमामात केले अंत्यसंस्कार - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 9:18 PM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती जिल्ह्यातून बंदोबस्तासाठी आलेल्या संतोष चराटे यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळं मृत्यू (Home Guard Died Of Heart Attack) झाल्याची घटना, रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

Home Guard Died
होमगार्डचा मृत्यू (Maharashtra Desk)

अमरावती Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. जळगाव जिल्ह्यात निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेल्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या रहिमापूर चिंचोली येथील होमगार्ड संतोष चराटे यांचे रविवारी पहाटे निधन (Home Guard Died Of Heart Attack) झाले.

जिल्ह्यातून 300 होमगार्ड जळगाव जिल्ह्यात तैनात : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यात 13 मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रिया दरम्यान सुरक्षा व्यवस्थेकरिता अमरावती जिल्ह्यातून एकूण 300 होमगार्ड तैनात करण्यात आले आहे. यामध्ये दर्यापूर पथकातून एकूण 100 होमगार्ड जळगाव येथे कर्तव्यावर रुजू झाले होते. या पथकामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर चिंचोली येथील रहिवासी असलेले होमगार्ड संतोष चराटे हे देखील होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखायला लागले. आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यामुळं त्यांचं निधन झालं. जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर त्यांचा पार्थिव शनिवारी रहिमापूर चिंचोली गावी आणण्यात आले.



शासकीय इतमात अंत्यसंस्कार : जळगाव येथून संतोष चराटे यांचे पार्थिव रविवारी त्यांच्या गावी पोहोचल्यावर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, पोलीस उपाधीक्षक गिरीश थातोड, पोलीस निरीक्षक विनोद धाडसे, अमरावती होमगार्ड फलटणचे नायक राम पिंजरकर आदी उपस्थित होते. संतोष चराटे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. शासनाकडून संतोष सराटे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी, ग्रामस्थांच्या वतीनं अधिकाऱ्यांकडं करण्यात आलीय.

हेही वाचा -

  1. 12 राज्यांचे मुख्यमंत्री, 20 केंद्रीय मंत्री, 20 किमीचा 'रोड शो'; उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी मोदी करणार शक्तीप्रदर्शन - Lok Sabha Election 2024
  2. शरद पवार आणि उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर...; प्रकाश आंबेडकरांचा सर्वात मोठा दावा - Lok Sabha Election 2024
  3. मतदान कसं करायचं माहिती आहे का? जाणून घ्या, A टू Z स्टेप्स - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.