ETV Bharat / state

आदिवासी महिलांनी बनवलेल्या वस्तूंची राज्यपालांना भुरळ, बांबूने दिला महिलांना रोजगार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 11:03 PM IST

Trible Woman Bamboo Products : पालघर जिल्ह्यातील भालिवली येथील सेवा विवेक संस्थेने आदिवासी आणि दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या अतिशय विपन्नावस्थेतील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवले आहे. बांबूपासून बनवलेल्या दोनशे प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तूंनी आता थेट राजभवनापर्यंत मजल मारली आहे. आता ऑनलाइन माध्यमातूनही या वस्तूंची विक्री सुरू असून महिला त्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.

Trible Woman Bamboo Products
Trible Woman Bamboo Products

बांबू कलाकृतीविषयी माहिती देताना माहिला

पालघर Trible Woman Bamboo Products : सेवा विवेक संस्थेच्यावतीनं या महिलांच्या प्रशिक्षणासाठी बिरसा मुंडा कार्यशाळा घेण्यात आली. त्यात या महिलांना बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू बनविण्याचे ४० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला आपल्या हस्तकौशल्याच्या बळावर बांबूपासून अतिशय आकर्षक, देखण्या आणि सुंदर वस्तू बनवायला लागल्या. या वस्तूंची विक्री केवळ पालघर जिल्ह्यातच नाही, तर थेट मुंबईपर्यंत पोहोचली आहे.

राज्यपालांकडून महिलांच्या कौशल्याची दखल : राज्यपाल रमेश बैस यांच्या कानावर या महिलांच्या कौशल्याची माहिती गेल्यानंतर त्यांनी स्वतः महिलांच्या कौशल्याचे कौतुक केले आणि राजभवनासाठीही काही वस्तू विकत घेतल्या. सेवा विवेक संस्थेने अतिशय गरीब परिस्थितीतील आदिवासी आणि दुर्गम भागातील महिलांची बांबूपासून वेगवेगळ्या दोनशे वस्तू बनवण्यासाठी निवड केली. कोरोनाच्या काळात महिलांच्या हाताला काम देण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम आता विस्तारला आहे.

बांबूपासून इमिटेशन ज्वेलरी : या महिलांनी बांबूपासून इमिटेशन ज्वेलरीसह अन्य वस्तू बनवल्या आहेत. बांबूपासून आकाश कंदील, सात प्रकारचे फ्रुट स्टॅन्ड, पाच प्रकारचे ट्रे, बांबू स्पीकर, व्हिजिटिंग स्टॅन्ड, पेन स्टँड, मोबाईल स्टॅन्ड, टी स्टॅन्ड, पेपर वेट, हॉटस्पॉट स्टॅन्ड, अगरबत्ती स्टॅन्ड, ज्वेलरी, फर्निचर, ट्रॉफी, की होल्डर, बुक होल्डर, राखी, परडी अशा सुमारे दोनशे प्रकारच्या वस्तू येथील आदिवासी महिला बनवतात. ऑनलाईन डिमांड वाढली: हस्तकौशल्य आणि कलेत गुंतवलेले मन यातून अतिशय सुंदर आणि आकर्षक वस्तू तयार होत असून आता या वस्तूंची मोहिनी जगाला पडली आहे. सेवा विवेक संस्था आता या वस्तूंची विक्री ऑनलाइन करीत आहे. या दोनशे वस्तूंच्या विक्रीतून अनेक निराधार, गरीब कुटुंबांना आधार मिळाला आहे. त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा स्तर उंचावला आहे.

१७० महिला स्वयंपूर्ण : सेवा विवेक संस्थेच्या माध्यमातून सुमारे १७० महिलांना मिळालेल्या रोजगारामुळे आता त्यांचा जीवनस्तरही उंचावला आहे. या पैशातून अनेक महिलांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला हातभार लावला आहे आणि मुले उच्चशिक्षित केली आहेत. या संस्थेच्या उपक्रमाची राज्यपाल रमेश बैस यांनीही दखल घेतली आहे. महिलांना शिक्षण दिले, त्यांच्या हातात कौशल्य आणले तर आपल्या अंगभूत कलागुणांच्या जोरावर त्या असाध्य ते साध्य करू शकतात. ही सेवा विवेक संस्था आणि तेथील १७० आदिवासी महिलांनी मिळवलेल्या कौशल्यपूर्ण रोजगारातून दिसून येते.

अन्य उपक्रम : सेवा विवेक पर्यटन केंद्र, मेडिटेशन सेंटर, पंचकर्म पिरॅमिड मेडिटेशन सेंटर, नैसर्गिक शेती, बचतगट अशा अनेक गोष्टींमधे महिलांना रोजगार उपलब्ध होत आहेत.

हेही वाचा:

  1. टीकेचा वार, शरद पवार! कायम पवारच का होतात विरोधकांचे टार्गेट? वाचा खास रिपोर्ट
  2. जनतेच्या पैशांतून 'मोदी की गॅरंटी' जाहिरात! आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार - पृथ्वीराज चव्हाण
  3. माजू पाहणाऱ्या हुकूमशहाचे मर्दन करून भारतमातेचं रक्षण करा - उद्धव ठाकरे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.