ETV Bharat / state

गोवा एनसीबीकडून आंतरराज्य तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश, नायजेरियाच्या मुख्य सूत्रधाराला पत्नीसह अटक - Goa NCB

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 9:22 AM IST

Goa NCB : गोवा एनसीबी टीमनं उत्तर गोव्यातून 7.35 ग्रॅम कोकेन जप्त केलाय. इतर कारवाईतही त्यांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तसंच एका नायजेरियन नागरिकाला पत्नीसह अटक करण्यात आलीय.

Goa NCB
गोवा एनसीबी टीमची मोठी कारवाई ड्रग नेटवर्कसाठी काम करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला अटक

मुंबई Goa NCB : गोवा एनसीबी टीमनं साळीगाव, उत्तर गोवा येथून 7.35 ग्रॅम कोकेन जप्त केल्याची माहिती एनसीबीचे अधिकारी अमित घावटे यांनी दिलीय. राजू मुलगा याच्याकडून हे कोकेनं जप्त करण्यात आलंय.

घरात आढळली गांजाची झाडं : घरात गांजाची लागवड होत असल्याची विशिष्ट माहिती मिळाल्यावर, एनसीबी गोवाच्या पथकानं उत्तर गोव्यातील सोकोरो इथं ब्रिटिश नागरिक असलेल्या जेसनच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान, या घरातून 33 नवीन उगवलेली गांजाची रोपे, 10 ग्रॅम गांजा आणि 40 हजार रुपयांची गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यात आली. टेरेस परिसरात ठेवलेल्या इतर शोभेच्या वनस्पतींसह फुलांच्या कुंड्यांमध्ये गांजाची रोपे उगवताना आढळून आली. आरोपीला यापूर्वी 22 सप्टेंबर रोजी एनसीबी गोवा यांनी 107 एक्स्टसी गोळ्या, 40 ग्रॅम एमडीएमए पावडर आणि 55 ग्रॅम चरस जप्त करत अटक केली होती.

गोव्यातील ड्रग नेटवर्कसाठी काम : या प्रकरणातील प्राथमिक तपासादरम्यान, स्टॅनली हा ड्रग्ज तस्कर असून नायजेरियन नागरिक असल्याचे समोर आली. त्याची पत्नी उषा सी दोघंही कँडोलिम, गोवा येथील राहातात. ते दोघे ड्रग नेटवर्कसाठी काम करत असल्याचं उघड झालं. तस्करीतील मुख्य सूत्रधार स्टॅन्लेनं काही स्थानिक लोकांशी संपर्क साधला होता. त्या संपर्कातून तो विविध ग्राहकांना मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवित होता. गोवा एनसीबीनं कांडोलिम इथं राहणाऱ्या टॅक्सीचालक मायकलला अटक केली आहे.

1 कोटी रुपये जप्त : तेलंगणा पोलिसांनी स्टॅनलीसा आधीच एनडीपीएस प्रकरणात अटक केली होती. उषा सी हिचा स्टॅनली पतीसह ड्रग्जची तस्करी आणि या ड्रग नेटवर्कद्वारे मिळालेल्या पैसे हाताळण्यात सक्रियपणे सहभागी असल्याचं आढळून आलं. त्यानंतर उषाला अटक करण्यात आली. संपूर्ण ड्रग्स नेटवर्क कमकुवत करण्यासाठी त्यांच्या बेकायदेशीरपणे मिळविलेल्या मालमत्तेची ओळख पटविण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आलीय. उषा सी आणि स्टॅनली यांच्या मालकीचे 1 कोटी 6 लाख 10 हजार 375 रुपये एनसीबीनं जप्त केले. स्टॅनले (नायजेरियन नागरिक) याला एनसीबी गोवानं अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

  1. DRI Seized Cocaine: 'डीआरआय'कडून फिल्मी स्टाईलनं आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 100 कोटींचं कोकेन जप्त
  2. विदेशातून आलेल्या प्रवाशानं 11 कोटींचं कोकेन लपविण्यासाठी लढवली अनोखी शक्क्ल; गुपित उघडताच डीआरआयनं घेतलं ताब्यात - Cocaine of 11 Crore Seized
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.