ETV Bharat / state

चक्क उन्हाळ्यात 'मिनी काश्मीर' हरवलं धुक्यात, पर्यटक लुटताहेत गुलाबी थंडीचा आनंद - Fog spread in Mahabaleshwar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 10:50 PM IST

Updated : May 26, 2024, 10:56 PM IST

Mahabaleshwar Tourists : संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट असाताना 'मिनी काश्मीर' म्हणजेच महाबळेश्वर धुक्यात हरवलंय. वातावरणातील बदलामुळं महाबळेश्वरमध्ये सकाळ-संध्याकाळ धुके पसरलं आहे. वेण्णा तलावात बोटिंगसह विविध ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.

Fog spread in Mahabaleshwar
महाबळेश्वरमध्ये धुके पसरले (ETV Bharat archive photo)

मिनी काश्मीर' हरवलं धुक्यात (Reporter ETV Bharat)

सातारा Mahabaleshwar Tourists : संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट असून उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे. असं असताना मात्र महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अर्थात महाबळेश्वर धुक्यात हरवलंय. वातावरणातील बदलामुळं महाबळेश्वरात सकाळी तसंच सायंकाळी धुक्याची दुलई पसरत आहे. अशा गुलाबी थंडीचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. वेण्णा लेकमधील नौका विहारासह विविध पॉईंटवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्यानं महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजून गेलं आहे.
महाबळेश्वरातील सिडनी पॉईंट, पारसी पॉईंटवरील गारवा पर्यटकांना सुखावून जात आहेत. वळीव पावसामुळं हिरव्यागार झालेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा देखील पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फेडत आहेत.

महाबळेश्वरचं सौंदर्य खुललं : यंदा कडक उन्हाळ्यामुळे महाबळेश्वरात गेली दोन महिने पर्यटकांनी गजबजून गेलंय. परंतु, महाबळेश्वरतही उन्हाचा पारा वाढला होता. मागील आठ दिवसांत झालेल्या पावसामुळं वातावरणात बदल झाला आहे. सकाळी आणि संध्याकाळी महाबळेश्वर परिसरावर धुक्याची चादर परसली आहे. धुक्यामुळं महाबळेश्वरचं सौंदर्य खुललं असून पर्यटकांना या सौंदर्यानं भुरळ घातली आहे.

पर्यटन व्यवसायात कोटींची उलाढाल : यंदाच्या उन्हाळ्यात महाबळेश्वरच्या पर्यटन व्यवसायात कोटींची उलाढाल झाली आहे. लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमुळं हॉटेल, रिसॉर्टचं बुकिंग हाऊसफुल्ल झालं होतं. बाजारपेठ पर्यटकांच्या गर्दीनं दिवसभर गजबजत आहे. स्थानिकांना देखील यंदा चांगला रोजगार मिळाला. प्रसिद्ध वेण्णा लेकवर हजारो पर्यटक नौका विहाराचा आनंद लुटत आहेत. महाबळेश्वर लगतचं पाचगणी टेबल लॅंड देखील पर्यटकांनी गजबजलंय.

हे वाचलंत का :

  1. EXCLUSIVE : "...तर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाही धोका दिला असता"; 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप - CM Eknath Shinde Interview
  2. केंद्रीय राज्यमंत्र्यांचे भाजपा आमदारांविरोधात उघड बंड; काय आहे नेमकं प्रकरण? - Lok Sabha Election 2024
  3. "बाळासाहेब असते तर यांना जोड्यांनी बडवलं असतं", मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल - CM Eknath Shinde Interview
Last Updated : May 26, 2024, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.