ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात बनावट नोटा आढळल्याने खळबळ - Fake Currency Nandurbar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 3:43 PM IST

Fake Currency Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव परिसरात बनावट नोटा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीचे वारे संपले आहेत. (Fake currency in election campaign) निवडणूक प्रचारात या नकली नोटा वापरल्या गेल्यात का? असा प्रश्न सर्वसामान्य व्यक्तींना पडला आहे.

Fake Currency Nandurbar
बनावटी चलन (Reporter)

बनावटी नोटांमुळे नंदुरबार जिल्ह्यात खळबळ (Reporter)

नंदुरबार Fake Currency Nandurbar : अति दुर्गम भाग असलेला जळगाव तालुका हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असल्याने ह्या नोट्या नेमक्या आल्या कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद नाही. (fake currency in Jalgaon) तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धडगाव शाखेत देखील कुठल्याही प्रकारच्या नोटा आढळून आल्या नाहीत अशी माहिती मिळत आहे.

धडगाव परिसरात बनावट नोटांचा सुळसुळाट : तीन राज्यांच्या सीमेवर असलेला धडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. नुकतीच लोकसभा निवडणूक संपल्यामुळे तालुक्यात बनावट चलन आढळून आल्याने ह्या बनावट नोटा निवडणूक काळात वापरल्या गेल्यात का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.


बनावट चलनामुळे व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली : अति दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या धडगाव परिसरातील बाजारपेठेत 500 रुपयांच्‍या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात आल्‍याने व्‍यापारी आणि ग्राहकांच्‍या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्‍या काही दिवसांत अनेक ठिकाणी पाचशेच्‍या बनावट नोटा चलनात आल्‍याचं निदर्शनास आलं आहे. या रॅकेटचा तपास करून कारवाईची मागणी केली जात आहे.


पेट्रोल पंपावर आढळल्या बनावट नोटा : धडगाव शहरातील पेट्रोल पंपावर 500 रुपयांची बनावट नोट आढळली. त्या नोटेची पुन्हा पडताळणी केली. मात्र, त्यातून बनावटच असल्याचं आढळून आलं. असाच प्रकार कायम घडत असल्याचं संबंधितांनी सांगितलं. यावरून शहर तालुक्यात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. कोणाकडून तरी आलेल्या बनावट नोटा सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहेत. त्यातच बँकेत भरणा करताना आर्थिक तोटाही सहन करावा लागत आहे. बनावट नोटांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई आवश्यक असताना पोलीस यंत्रणेचेच याकडे दुर्लक्ष आहे. शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून बनावट नोटा आढळण्याचं प्रमाण वाढलं आहे; परंतु आर्थिक नुकसान आणि चौकशी टाळण्यासाठी फसगत झालेले नागरिक तक्रार करण्यास घाबरत आहेत.


बँकेत बनावट चलन आढळले नाही - बँक अधिकारी : धडगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कुठल्याही प्रकारचं बनावट चलन आढळून आलेलं नाहीत. तसंच बनावट चलन आढळून आल्यास संबंधित व्यक्तीची संपूर्ण चौकशी केली जाते. बनावट चलन कुठून आलं याबाबत पुरावा संबंधित व्यक्तीला द्यावा लागतो. अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते, असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकाऱ्यांनी सांगितलं.


तक्रार दाखल नाही - पोलीस निरीक्षक : जळगाव तालुक्यात बनावट नोटांचा सुळसुळाट सुरू आहे. सदर चलन हे व्यापारी आणि पेट्रोल पंप चालकांना दिलं जात आहे. मात्र याबाबत कुठल्याही व्यक्तीने धडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. तक्रार दिल्यास त्वरित कायदेशीर कारवाई करून संबंधित व्यक्तींचा त्वरित तपास सुरू केला जाईल. तसंच नागरिकांनी याबाबत तक्रार देण्यास पुढे यावं असं आवाहन देखील पोलीस निरीक्षक आय.एन. पठाण यांनी केलं आहे.


हेही वाचा :

  1. डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटात मृतांचा आकडा 11 वर , गुन्हा दाखल होताच कारखानदार फरार - Dombivli MIDC Blast
  2. एनडीएच्या पासिंग आऊट परेडला सैन्यप्रमुखांनी लावली हजेरी, महिला कॅडेट्सचं केलं कौतुक - NDA Passing Out Parade
  3. राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.