ETV Bharat / state

कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकचा चेहरा बदलण्याची मोठी संधी; फडणवीसांनी वाचली विकास कामांची यादी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 8:15 AM IST

Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendr Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थिती 204 कोटींच्या विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

नाशिक Devendra Fadnavis : आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. या कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. मेळा बसस्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

आधुनिक शहर म्हणून नाशिकची ओळख : नाशिक शहर हे विकासासाठी दत्तक घेतलं असल्यानं येणाऱ्या काळात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. नाशिक शहर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ज्वाजल्य विचारांची भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे. आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून एक आधुनिक शहर म्हणून नाशिकची ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.



शहराचा चेहरा बदलणार : रिंगरोड हा शहराच्या विकासाचे केंद्र मानले जाते. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं शहरात नियोजित असलेल्या रिंगरोड काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच नाशिक पुणे फास्ट रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडं सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत आहे. यासोबतच नाशिक शहरासाठी निओ मेट्रोचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. नाशिक शहराचा चेहरा बदलण्यासाठी विविध प्रकल्प नाशिकला देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन कटीबद्ध आहे. आज आधुनिक सुविधेनं सज्ज असं मेळा बसस्थानकाचं झालं आहे. या स्मार्ट बसस्थानकासाठी लवकरच स्मार्ट बस उपलब्ध होणार आहेत. नाशिकच्या विकासाच्या अनुषंगानं प्रलंबित असणारी विकास कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.




हे विकास कामे मार्गी लावावी : मेळा बसस्थानक पाहिल्यावर बसस्थानक नाहीतर विमानतळावर आल्याची अनुभूती येते. आरोग्य विद्यापीठात मेडिकल कॉलेज आणि रूग्णालय व्हावे, गंगापुर डॅम परिसरात कन्व्हेन्शन सेंटर, साहसी क्रीडा संकुल, कृषि टर्मिनल मार्केट, इगतपुरीला हिल्स स्टेशन, व्दारका ते नाशिक रोड रस्त्याचं चौपदरीकरणासह उड्डाणपुल अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून नाशिकच्या विकासासोबत राज्याचा देखील विकास करण्यात यावा अशी अपेक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलीय.



असे आहे एसी बस स्थानक : राज्यातील पहिले वातानुकुलीत मेळा बसस्थानक असून कुंभमेळ्याच्या पार्शवभूमीवर बांधलेले नवीन मेळा बसस्थानकाच्या 1.73 हेक्टर जागेमध्ये वसलेल्या या बसस्थानक 6033.22 चौरस मीटर इमारतीचं बांधकाम करण्यात आलं आहे. या बसस्थानकात 20 प्लॅटफॉर्म असून 4 प्लॅटफॉम हे वातानुकूलित आहेत. यासोबतच वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण कक्ष, हिरकणी कक्ष, महिला, पुरुष, चालक वाहकांसाठी स्वतंत्र विश्रामगृह, उपहारगृह, एस. टी. बँक, तळघरामध्ये प्रशस्त पार्किंग, स्थानक प्रमुख कक्ष, 8 वाणिज्य आस्थापना, पॉवर रूम, वाहनतळास ट्रिमिक्स काँक्रीट आदि सुविधा देण्यात आल्या आहेत.


या कामांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण आणि भूमिपूजन
-अभिवन भारत मंदिर भूमिपूजन
-संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर सभामंडप भूमीपूजन
-प्रमोद महाजन उद्यान भूमीपूजन
-स्मार्ट स्कूल लोकार्पण
-अटल स्वाभिमान भवन लोकार्पण
-स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव भूमीपूजन
-अटल जलकुंभ आणि सुरेश मानकर जलकुंभ लोकार्पण
- सातपूर पोलीस स्टेशन नवीन इमारतीचे उद्घाटन
- बालाजी मंदिर भक्त निवास
- सोमेश्वर धबधबा येथील गोदावरी नदीवरील पूल
-नविन नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (सेंट्रल पार्क) टप्पा क्र.2
-नाशिक पश्चिम मतदार संघात विविध ठिकाणी सीसीटिव्ही बसविणे

हेही वाचा -

  1. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून उद्धव ठाकरेंची बोचरी टीका, आता फडणवीसांनीही दिलं सणसणीत उत्तर
  2. 'गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यसरकार', संजय राऊत यांचा महायुतीवर निशाणा
  3. गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेनं का चुकवावी - सुप्रिया सुळे यांचा सवाल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.