ETV Bharat / state

खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले, मुंबईकरांना.... - Cm Pre Monsoon Meeting

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 3:56 PM IST

Updated : May 26, 2024, 4:08 PM IST

CM Eknath Shinde Pre-Monsoon Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुंबई खड्डेमुक्त करण्याचा निर्धार केला. येत्या अडीच वर्षांत मुंबईत एकही खड्डा दिसणार नाही. पुढील 25 ते 30 वर्षे मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही, असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Cm Eknath Shinde Pre-Monsoon Meeting
Cm Eknath Shinde Pre-Monsoon Meeting (Reporter ETV Bharat Maharashtra)

मुंबई CM Eknath Shinde Pre-Monsoon Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई मान्सून पूर्व नालेसफाई कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरुवातीला वडाळा येथील नालेसफाईची पाहणी केली. त्यानंतर बांद्रातील मेठी नदी येथील नालेसफाईची पाहणी केली. यावेळी 100% पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकारी, कर्मचारी यांना दिले.


नालेसफाई श्रेयवादासाठी नाही : नालेसफाई कामांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पावसाळ्यापूर्वी शंभर टक्के नालेसफाई झाली पाहिजे. मुंबईत पाणी कोठोही पाणी साचू नये यासाठी उपाय योजना करण्याच्या सुचना शिंदे यांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या विभागात पाणी साठण्याची शक्यता आहे, अशा ठीकाणी हाय प्रेशरचे पंप ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नालेसफाईची पाहणी श्रेय घेण्यासाठी करत असल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली होती. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही कुठलेही कामं किंवा नालेसफाईची कामं श्रेयासाठी करत नाही. आम्ही लोकांच्या हितासाठी काम करतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांना लगावला.

कारवाई करणार : दुसरीकडं पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नालेसफाई झाली पाहिजे, याची जबाबदारी पालिका अधिकारी, कर्मचारी यांची असेल. जे अधिकारी, कर्मचारी आपल्या कामात दिरंगाई करतील त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगरण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनीही कचरा टाकताना काळजी घेतली पाहिजे. कचरा नाल्यात न टाकता कचराकुंडी टाकावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना केलंय.

हे वाचलंत का :


गडकरींविरोधात मोदी, शाह आणि फडणवीसांचा कट; राऊतांच्या आरोपावर काय म्हणाले महायुतीतील नेते? - Sanjay Raut News

"बाळासाहेब असते तर यांना जोड्यांनी बडवलं असतं", मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल - CM Eknath Shinde Interview

"लहान मुलगासुद्धा सांगेल की नवनीत राणा..."; राणांच्या विजयावर आमदार बच्चू कडू यांचं भाकीत - Lok Sabha Election 2024

Last Updated : May 26, 2024, 4:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.